PAN-Aadhaar लिंक करण्याचा शेवटचा दिवस, उद्यापासून 1000 रुपये दंड; पॅनकार्ड असं करा लिंक!
मुंबई: जर आपण अद्याप आपलं पॅनकार्ड हे आधारशी लिंक केलेलं नसेल तर आपल्याकडे आता फक्त अवघे काही तास शिल्लक आहेत. पॅनकार्ड आधारशी लिंक करण्यासाठी 31 मार्च 2021 हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आजच्याच आजच आपल्याला हे काम करावं लागणार आहे. अन्यथा पॅनकार्ड संबंधित कामात आपल्याला अडचण येऊ शकते. वास्तविक, पॅनकार्ड आधारशी जोडण्याची शेवटची तारीख 31 […]
ADVERTISEMENT

मुंबई: जर आपण अद्याप आपलं पॅनकार्ड हे आधारशी लिंक केलेलं नसेल तर आपल्याकडे आता फक्त अवघे काही तास शिल्लक आहेत. पॅनकार्ड आधारशी लिंक करण्यासाठी 31 मार्च 2021 हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आजच्याच आजच आपल्याला हे काम करावं लागणार आहे. अन्यथा पॅनकार्ड संबंधित कामात आपल्याला अडचण येऊ शकते.
वास्तविक, पॅनकार्ड आधारशी जोडण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे. जर आपण आपला पॅन नंबर 31 मार्चपूर्वी आधारशी लिंक केला नाही तर आपले पॅनकार्ड पुढील महिन्यापासून निष्क्रिय होईल. इतकेच नाही तर 31 मार्चनंतर पॅनकार्ड आणि आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला दंड म्हणून 1000 रुपये मोजावे लागतील.
Fact Check- मार्चनंतर 5,10 आणि 100 च्या नोटा बंद होणार?
गेल्या आठवड्यात सरकारने लोकसभेत वित्त विधेयक 2020 मंजूर केले ज्यामध्ये नवीन कलम 234H समाविष्ट करण्यात आलं आहे. ज्या अंतर्गत पॅनकार्ड आधारशी लिंक करण्यास उशीर केल्यास 1000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.