फ्रान्सच्या चर्चमध्ये 3 लाखांहून अधिक मुलांचं लैंगिक शोषण, अहवालातून धक्कादायक माहिती समोर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

फ्रान्सच्या कॅथोलिक चर्चमध्ये अंदाजे 3 लाख 30 हजार मुलांचं लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात समोर आली आहे. पहिल्यांदाच फ्रान्समध्ये एवढ्या प्रमाणात अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. जे मुलांवर घाणेरडी नजर ठेवतात, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करतात त्यांनी पीडोफाइल सक्रिय होते. फ्रान्सच्या चर्चमध्ये बाल लैंगिक शोषणाच्या प्रकरणांच्या तपासात गुंतलेल्या स्वतंत्र आयोगाने ही माहिती दिली आहे. मागच्या सत्तर वर्षांबाबतचा हा अहवाल आहे.

ADVERTISEMENT

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार अहवाल जारी करणारे आयोगाचे अध्यक्ष जीन-मार्क सॉवे यांनी याबाबत माहिती दिली आहे. वैज्ञानिक संशोधनाच्या आधारावर या अनुमानात फादर तसंच चर्चमध्ये सामील नसलेल्या धर्मगुरूंनी केलेल्या गैरवर्तनांचा समावेश यामध्ये सुमारे 80 टक्के पुरूष पीडित आहेत. हे खूपच भयंकर आहे. लैंगिक शोषण झालेल्या सुमारे 60 टक्के पुरूष आणि स्त्रियांना त्यांच्या भावनिक किंवा लैंगिक जीवनात मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं असंही सॉवे यांनी म्हटलं आहे.

एका स्वत्रंत आयोगाने तयार केलेल्या अडीच हजार पानांच्या अहवालाने इतर देशांप्रमाणेच फ्रान्समधील कॅथलिक चर्चने लपवलेला हा प्रकार समोर आला आहे. अहवालात हे देखील नमूद करण्यात आलं आहे की लैंगिक अत्याचार करणाऱ्या तीन हजार लोकांमध्ये दोन तृतीयांश धर्मगुरू होते, जे त्या काळात चर्चमध्ये काम करत होते. पीडितांच्या एकूण आकडेवारीमध्ये मुख्य धर्मगुरू आणि इतर धर्मगुरू यांनी गैरवर्तन केलेल्या सुमारे 2 लाख 16 हजार जणांचा समावेश आहे.

हे वाचलं का?

या अहवालाबाबत योगदान देणाऱ्या पार्लर एंट रिव्हियर (स्पीक आऊट अँड लिव्ह अगेन) चे प्रमुख ऑलिव्हिअर सॅविनाक यांनी AP ला असे सांगितले की हे सगळं फार भयंकर प्रकरण आहे. आयोगाने सुमारे अडीच वर्षे काम केले आहे आणि या घटनांमध्ये बळी पडलेल्या पीडितांचे ऐकून घेतलं आहे. एवढंच नाही तर 1950 च्या सुमारास दशकात चर्च, न्यायालय, पोलीस या माध्यमांचाही अभ्यास केला आहे.

सॉवे म्हणाले की, २२ कथित गुन्हे ज्याचा अद्याप पाठपुरावा केला जाऊ शकतो त्यांना वकिलांकडे पाठवण्यात आले आहे. ४० हून अधिक प्रकरणे जी खूप जुनी आहेत पण कथित गुन्हेगार जे अद्याप जिवंत आहेत त्यांना चर्च अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

गैरप्रकार कसा रोखता येईल याविषयी आयोगाने ४५ शिफारसी जारी केल्या आहेत. कॅनन कायद्यात सुधारणा करणे. व्हॅटिकन चर्चचा वापर करण्यासाठी कायदेशीर संहिता आणि पीडितांना ओळखण्यासाठी आणि भरपाईसाठी धोरणांना प्रोत्साहन देणे यामध्ये समावेश आहे. सॉवे म्हणाले की, प्रशिक्षण पुजारी आणि इतर कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.

ADVERTISEMENT

फ्रेंच कॅथोलिक चर्चला हादरवून टाकणाऱ्या पास्टर बर्नार्ड प्रेनॉट यांच्या घोटाळ्यानंतर हा अहवाल आला आहे. गेल्या वर्षी, प्रेनॉटला अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते आणि त्याला पाच वर्षांचा तुरुंगवास देण्यात आला होता. त्याने दशकांपासून ७५ हून अधिक मुलांवर अत्याचार केल्याची कबुली दिली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT