Nagpur Crime : बर्थ-डे पार्टीत धक्का लागल्याचं निमीत्त, तरुणावर प्राणघातक हल्ला
मित्राने आयोजित केलेल्या बर्थ-डे पार्टीत जाणं नागपुरच्या एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. बर्थ-डे पार्टीत डीजे च्या तालावर नाचताना धक्का लागल्याचं क्षुल्लक कारण देत चौघा जणांनी नीरज तिवारी या तरुणावर प्राणघातक हल्ला केला आहे. नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंद रवतेल या तरुणाने शनिवारी आपल्या वाढदिवसानिमीत्त नागपुरातील एका हॉटेलमध्ये […]
ADVERTISEMENT
मित्राने आयोजित केलेल्या बर्थ-डे पार्टीत जाणं नागपुरच्या एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. बर्थ-डे पार्टीत डीजे च्या तालावर नाचताना धक्का लागल्याचं क्षुल्लक कारण देत चौघा जणांनी नीरज तिवारी या तरुणावर प्राणघातक हल्ला केला आहे. नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंद रवतेल या तरुणाने शनिवारी आपल्या वाढदिवसानिमीत्त नागपुरातील एका हॉटेलमध्ये पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी मुकुंदच्या अन्य मित्रांसोबत नीरजही या पार्टीत सहभागी झाला होता. यावेळी नाचत असताना धक्का लागल्यामुळे पारस धुर्वे, धम्मदीप हनवते, मंगल मोहोळ आणि सूरज गायकवाड या तरुणांनी चाकूने हल्ला केला.
या प्रकारानंतर पार्टीत चांगलाच गोंधळ उडाला. एमआयडीसी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परंतू तोपर्यंत चारही आरोपी पसार झाले होते. पोलिसांच्या मते चारही आरोपी सराईत गुन्हेगार असून पसार झाल्यानंतर त्यांनी आपले मोबाईल बंद ठेवले आहेत. दरम्यान जखमी नीरज तिवारीवर सिताबर्डी भागातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT