ज्येष्ठ नागरिकांसोबत सेक्सटॉर्शन, Video कॉलनंतर ब्लॅकमेलिंग; नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

इंदूर: मध्य प्रदेशमधील इंदूरच्या विजयनगर पोलिसांनी शिवपुरीच्या एका मोठ्या टोळीतील चार जणांना सेक्सटॉर्शन (Sextortion) प्रकरणात अटक केली आहे. सध्या या चारही आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. आरोपींनी ज्येष्ठ नागरिकांना (senior citizens) व्हीडिओ कॉलिंगद्वारे (Video calls) ब्लॅकमेल (Blackmailing) करून लाखोंची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

या टोळीला 4G सिम पुरवणाऱ्या निखिल नावाच्या तरुणाला आणि त्याच्या इतर दोन साथीदारांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. हे आरोपी मोठ्या प्रमाणात बनावट सिम पुरवायचे. ते गरीब लोकांना त्यांच्या नावावर सिम अॅक्टिव्ह करायला भाग पाडायचे आणि नंतर तेच सिम ते सेक्सटॉर्शन करणाऱ्या टोळीला विकायचे.

विजयनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाशी संबंधित टोळीतील सदस्य ज्येष्ठ नागरिकांना व्हीडिओ कॉलिंग करत असत. बनावट फेसबुक आयडी तयार करून हे कॉल केले जात होते. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करण्यात यायचं. यापूर्वी या टोळीतील चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींनी अश्लील व्हीडिओ तयार करुन अनेक ज्येष्ठ नागरिकांकडून लाखो रुपये उकळले होते.

हे वाचलं का?

दारूचे व्यसन असलेल्या लोकांना केलं जायचं लक्ष्य

या टोळीची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी अशी माहिती दिली की, निखिल गुप्ता आणि इतर काही लोक मिळून या टोळीला बँक खाती आणि बनावट सिम पुरवायचे. त्या आधारे पोलिसांनी शिवपुरी येथून निखिल गुप्ता, सागर पुरी यांना अटक केली आहे.

ADVERTISEMENT

चौकशीत आरोपींनी सांगितले की, ते 40 ते 50 वयोगटातील अशा लोकांना टार्गेट करायचे ज्यांना दारूचे प्रचंड व्यसन आहे. आरोपी गरीब मजूर लोकांकडून त्यांच्या आधारकार्डद्वारे सिम अॅक्टिव्हेट करून घ्यायचे आणि नंतर खाते क्रमांक आणि सिम टोळीला पाठवायचे.

ADVERTISEMENT

पत्नींची अदलाबदली करुन उच्चभ्रू चालवत होते सेक्स रॅकेट, WhatsApp वर बनवलेला ग्रुप!

पोलीस स्टेशन प्रभारी विजयनगर इंदौर तहजीब काझी म्हणाले की, ‘सध्या पोलिसांना टोळीतील इतर सदस्यांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच पोलीस इतर आरोपींचा देखील सध्या शोध घेत आहेत. ही संपूर्ण टोळी आधी बराच काळ अलवरमध्ये सक्रिय होती. आरोपी हे विद्यार्थी असल्याचे भासवून भाड्याने खोली घ्यायचे आणि तिथूनच आपला हा सगळा ब्लॅकमेलिंगचा अवैध धंदा चालवत होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT