NCB च्या समीर वानखेडेंना झटका, आर्यन खान प्रकरणासहीत पाच केसेसच्या चौकशीचे अधिकार काढले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

NCB च्या समीर वानखेडेंना मोठा झटका मिळाला आहे. कारण आर्यन खान प्रकरणासहीत पाच प्रकरणांच्याचौकशीचे अधिकार समीर वानखेडेंकडून काढण्यात आले आहेत. दिल्लीच्या एनसीबी मुख्यालयाने हे अधिकार काढून काढण्यात गेले आहेत. आर्यन खान प्रकरण आणि इतर पाच केसेसची चौकशी कऱण्याचे अधिकार आता समीर वानखेडेंकडून काढून घेण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

ड्रग्ज केसमध्ये आर्यन खान अडकल्याचं पाहून व्यथित झाले राहुल गांधी, शाहरुख खानला लिहिलं पत्र..

काय म्हणाले आहेत एनसीबीचे मुथा अशोक जैन ?

हे वाचलं का?

समीर वानखेडे यांना सहा केसेसवरून हटवण्यात आलं आहे. यामध्ये आर्यन खान प्रकरणाचाही समावेश आहे. या प्रकरणांचा तपास आता दिल्ली एनसीबीकडून केला जाईल. हा प्रशासकीय निर्णय आहे असंही स्पष्ट कऱण्यात आलं आहे.

ड्रग्ज क्रूझ केस प्रकरणात २ ऑक्टोबरला कारवाई करून आठ जणांना अटक केली होती. यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली. आर्यन खानला 27 ऑक्टोबरपर्यंत तुरुंगात रहावं लागलं. यासंदर्भात नवाब मलिक यांनी 6 ऑक्टोबरपासून पत्रकार परिषद घेऊन ही सगळी कारवाई बनाव आहे असं सांगितलं. आता या प्रकरणी समीर वानखेडे यांना चौकशीतून हटवण्यात आलं आहे. सहा केसेसमधून त्यांना हटवण्यात आलं आहे. या प्रकरणात समीर वानखेडेंवर पैसे मागितल्याचे आरोप लावले गेले आहेत. तसंच नवाब मलिक यांनी त्यांच्या सर्टिफिकेटवरून, लग्नावरून, जातीवरून अनेक व्यक्तीगत आरोप केले आहेत. त्यानंतर एनसीबीने हे पाऊल उचललं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

समीर वानखेडेंवर नवाब मलिक यांनी 6 ऑक्टोबरला घेतलेल्या पत्रकार परिषदेपासून काय काय आरोप केले आहेत?

समीर वानखेडे यांनी क्रूझवर केलेली कारवाई हा सगळा बनाव आहे, शाहरुखच्या मुलाला टार्गेट करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत, मात्र सरकारी नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी खोटी जात प्रमाणपत्रं सादर केली आणि त्याद्वारे नोकरी मिळवली.

समीर वानखेडे हे ७० हजारांचा शर्ट, दोन लाखांचे बूट वापरतात.

समीर वानखेडे मालदिव्सला गेले होते तिथे त्यांनी बॉलिवूडच्या कलाकारांसोबत डील केलं होतं

समीर वानखेडे यांना मेहुणा आहे, तो व्हेनिसला राहतो. तो मुस्लिम आहे. त्यांचं कुटुंबही मुस्लिम आहे.

वानखेडेंनी बोगस दाखल्यावर नोकरी मिळवली आहे. वानखेडे कुटुंबाने 2015पासून आपली ओळख लपवली.

प्रभाकर साईलने काय आरोप केले?

ऑक्टोबर महिन्यात एनसीबीच्या ड्रग्ज प्रकरणातला साक्षीदार क्रमांक एक म्हणजेच प्रभाकर साईल हा मीडियासमोर आला. त्याने आरोप केला आहे की किरण गोसावीने शाहरुख खानच्या मॅनेजरकडे आर्यनला सोडण्याच्या बदल्यात 25 कोटींची मागणी केली होती. यातले ८ कोटी रूपये हे समीर वानखेडेंना द्यायचे होते असंही प्रभाकर साईलने स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT