देशातले 53 टक्के Corona रूग्ण महाराष्ट्र आणि केरळमधले, आरोग्य मंत्रालयाची माहिती
देशातील कोरोनाच्या बाधितांची रोजची संख्या 50 हजारांपेक्षा कमी झाली आहे. तरीही कोरोनाचा धोका मात्र कमी झालेला नाही. कोरोनाची दुसरी लाट अजूनही पूर्णपणे ओसरली नाही. महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांमध्ये मिळून देशाच्या एकूण रूग्णसंख्येच्या 53 टक्के रूग्ण आहेत असं आता आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. केरळच्या 14 आणि महाराष्ट्रातल्या 15 जिल्ह्यांमध्ये अजूनही चिंताजनक स्थिती आहे. आरोग्य […]
ADVERTISEMENT
देशातील कोरोनाच्या बाधितांची रोजची संख्या 50 हजारांपेक्षा कमी झाली आहे. तरीही कोरोनाचा धोका मात्र कमी झालेला नाही. कोरोनाची दुसरी लाट अजूनही पूर्णपणे ओसरली नाही. महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांमध्ये मिळून देशाच्या एकूण रूग्णसंख्येच्या 53 टक्के रूग्ण आहेत असं आता आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. केरळच्या 14 आणि महाराष्ट्रातल्या 15 जिल्ह्यांमध्ये अजूनही चिंताजनक स्थिती आहे. आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी देखील हे म्हटलं आहे की कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. हा विषाणू अजूनही त्याचा प्रादुर्भाव दाखवू शकतो अशा स्थितीत कोरोना प्रोटोकॉलचं उल्लंघन करणं हे घातक ठरू शकतं.
मागच्या आठवड्यात भारतात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांपैकी 53 टक्के रूग्ण महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांमध्ये आढळून आले आहेत. देश अजूनही दुसऱ्या लाटेशी लढा देतो आहे. अशा स्थितीत आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अनेकांना असं वाटतं आहे की कोव्हिड संपला. त्यामुळे लोक निष्काळजीपणाने बाहेर फिरत आहेत, मास्क वापरत नाहीत असंही दिसून आलंय. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नाहीत असंही समोर आलंय. या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतात असं आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
आरोग्य मंत्रालयाने पर्यटन स्थळांवर होणाऱ्या गर्दीबाबतही भाष्य केलं आहे. ‘पर्यटन स्थळी होणारी गर्दी पाहिल्यानंतरच हे लक्षात येतं की लोक कोव्हिड प्रोटोकॉलचे नियम पाळत नाहीत. पर्यटन स्थळांवर होणारी गर्दी आणि तिथे न पाळले जाणारे नियम हा चिंतेचा विषय ठरू शकतो. एवढंच काय ज्या पर्यटन स्थळी लोक जातात तिथून परत आल्यानंतरही ते कोव्हिड प्रोटोकॉलचे नियम पाळत नाहीत असंही दिसून आलं आहे. असंच घडत राहिलं तर कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू शकतो.’ असंही सरकारने स्पष्ट केलं आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
देशभरात नवीन कोरोना बाधितांचं प्रमाण हे आठ टक्क्यांनी घटलं आहे. देशातल्या 90 जिल्ह्यांमध्ये 80 टक्के नवे बाधित गेल्या आठवड्यात आढळले आहेत. यावेळी लव अग्रवाल यांनी इतर देशांचीही उदाहरणं दिली. रशिया, बांगलादेश आणि ब्रिटनच्या उदाहरणांवरून आपण धडा घ्यायला हवा. तिथे रूग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. ब्रिटनमध्ये युरो चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी लोकांनी फुटबॉल सामने पाहण्यासाठी गर्दी केली. आता तिथे कोरोना रूग्ण वाढत आहेत.
शुक्रवारी भारतात एकूण 43,393 नवीन करोना बाधितांची नोंद झाली आहे. देशातील एकूण बाधितांची संख्या 3,7,52,950 इतकी झाली आहे. आजपर्यंत देशात 2,98,88,284 जण कोरोनातून बरे झाले आहेत. तर 4,5,939 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे अशीही माहिती देण्यात आली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT