Independence Day: जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच निवडणुका होणार, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: भारताच्या 75 व्या स्वतंत्र दिनानिमित्त (75th Independence Day) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण पार पडलं. यावेळी अत्यंत जल्लोषात हा सोहळा पार पडला. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित केलं. (Independence Day Celebration 2021)

ADVERTISEMENT

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली. येत्या काही दिवसातच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येणार आहे. कलम 370 हटविण्यात आल्यानंतर येथे निवडणुका घेण्यात याव्या अशी मागणी अनेक जण करत होते. मात्र, आता याबाबत केंद्र सरकारने सकारात्मक पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे.

पाहा पंतप्रधान मोदींच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे

हे वाचलं का?

  • भारतासमोर दहशतवाद आणि विस्तारवाद या दोन समस्यांशी लढत आहे आणि त्याला चोख प्रत्त्युतर देखील देत आहे.

  • सर्जिकल आणि एअर स्ट्राईक करुन भारताने देशाच्या शत्रूंना नवा भारत काय आहे हे दाखवून दिलं आहे.

  • ADVERTISEMENT

  • नॅशनल हायड्रोजन मिशनची घोषणा करत आहे. पर्यावरणपूरक भारतासाठी ही घोषणा आहे.

  • ADVERTISEMENT

  • सैनिकी शाळेत मुलींना देखील मिळणार प्रवेश, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

  • आता सरकारने ठरवलं आहे की, देशातील सर्व सैनिकी शाळेत मुलींना देखील शिक्षणासाठी प्रवेश देण्यात येईल.

  • कालबाह्य कायद्याच्या कचाट्यातून देशाची सुटका करण्याची वेळा आली आहे.

  • कालबाह्य झालेले नियम, प्रक्रिया रद्द करण्याचं केंद्र आणि राज्य सरकारांना आवाहन

  • भारत येत्या काही दिवसातच प्रधानमंत्री गतीशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन सुरू करणाार आहे.

  • केंद्र सरकार ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची निर्मिती करणार, पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा

  • या उत्पादनांना देशात आणि परदेशात मोठी बाजारपेठ मिळावी, यासाठी आता सरकार ई- कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार करेल.

  • देशातील लहान शेतकऱ्यांच्या सामूहिक शक्तीमध्ये आणखी वाढ केली पाहिजे. त्यांना नव्या सुविधा दिल्या पाहिजेत

  • गावात आपल्या बचतगटांशी संबंधित 8 कोटीपेक्षा जास्त महिला भगिनी आहेत, त्या एकापेक्षा एक उत्तम उत्पादने तयार करतात.

  • आता गावांमध्ये ऑप्टिकल फायबर नेटवर्क, डेटा यांचे बळ पोहोचू लागले आहे, गावात देखील डिजिटल उद्योजक तयार होत आहेत

  • आज आपण गावांमध्ये झपाट्याने परिवर्तन होत असताना पाहात आहोत.

  • देशात 110 हून जास्त आकांक्षी जिल्ह्यात शिक्षण, आरोग्य, पोषण, रस्ते, रोजगार यांच्याशी संबंधित योजनांना प्राधान्य दिले जात आहे. यापैकी अनेक जिल्हे आदिवासी क्षेत्रात आहेत

  • देशातील जे जिल्हे मागास असल्याचे मानण्यात आले होते त्यांच्या आकांक्षा आम्ही जागृत केल्या आहेत.

  • 21 व्या शतकात भारताला नव्या उंचीवर नेण्यासाठी भारताच्या सामर्थ्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे यासाठी जे वर्ग मागे आहेत त्यांना आपल्याला मदतीचा हात दिलाच पाहिजे

  • आपला पूर्व भारत, ईशान्य भाग, जम्मू काश्मीर, लडाखसह संपूर्ण हिमालय क्षेत्र असो, आपला किनारपट्टीचा भाग किंवा आदिवासी क्षेत्र असो, हे भाग भविष्यात भारताच्या विकासाचा मोठा आधार बनतील.

  • जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी तयारी केली जात आहे. लवकरच इथे निवडणुका होणार

  • कुपोषणमुक्त केंद्र सरकारचा निर्धार आहे.

  • गरीबांना पोषणयुक्त तांदळाचं वाटप करणार

  • देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत सोयी सुविधा पोहचल्या पाहिजेत.

  • कोणत्याही क्षेत्रात भारत मागे राहता कामा नये असा संकल्प करुयात

  • सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हे लक्ष्य प्राप्तीसाठी खूप गरज आहे.

  • 100 व्या स्वातंत्र्य दिनाला अद्याप 25 वर्ष आहेत. पण आपल्याला तेवढा वेळ पाहून चालणार नाही. हीच योग्य वेळ आहे. आपल्याला सर्वांना बदलावं लागणार आहे.

  • विचार करा आपल्याकडे जर स्वत:ची लस नसती तर? भारतात स्वत:ची पोलिओ लस मिळण्यासाठी किती वेळ गेला. पण आज आपण गर्वाने सांगू शकतो की, जगातील सर्वात मोठं लसीकरण अभियान सुरु आहे.

  • कोरोना योद्धांचे कौतुक करावं तेवढं थोडं आहे.

  • जे लोकं फाळणीच्या वेळी प्रचंड दु:ख भोगले ते लोकं आपल्या स्मृतीत राहणे गरजेचं आहे.

  • आपण स्वातंत्र्याचा दिवस साजरा करतो पण फाळणीचं दु:ख कायम आहे.

  • टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या ऑलिम्पिक खेळाडूंचं पंतप्रधानांकडून टाळ्या वाजवून कौतुक

  • भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू जी, देशाला एकजूट राष्ट्र म्हणून आकार देणारे सरदार वल्लभभाई पटेल किंवा भारताला भविष्याचा मार्ग दाखवणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर, अशा प्रत्येक महान व्यक्तित्वांचे स्मरण देश करत आहे, देश या सर्वांचा ऋणी आहे.

  • पंतप्रधान मोदींनी तिरंगा फडकवल्यानंतर तिरंग्यावर हेलिकॉप्टरमधून करण्यात आली पुष्पवृष्टी

  • ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेता नीरज चोप्रासह 32 खेळाडू उपस्थित

  • पंतप्रधान मोदींच्या भाषणाला सुरुवात

  • पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न

  • पंतप्रधान मोदींचं लाल किल्ल्यावर आगमन

  • यंदाचा स्वातंत्र्य दिन हा खूपच विशेष आहे. कारण हा 75 वा स्वातंत्र्य दिन आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केलं. दरवेळी प्रमाणे या वेळीही पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश केला आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी ध्वजारोहण केलं तेव्हा भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरने तिरंग्यावर फुलांचा वर्षाव केला.

    Indian Independence Day: 15 ऑगस्ट ही तारीख स्वातंत्र्य दिन म्हणून का निवडली गेली?

    संरक्षण मंत्रालयाने शनिवारी माहिती दिली होती की, भारतीय वायुसेनेची (IAF) दोन Mi-17 1V हेलिकॉप्टर स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवताच कार्यक्रमस्थळी फुलांचा वर्षाव करण्यात आला. संरक्षण मंत्रालयाच्या मते, या हेलिकॉप्टरचे कॅप्टन विंग कमांडर बलदेव सिंह बिष्ट होते तर दुसऱ्या हेलिकॉप्टरची कॅप्टन विंग कमांडर निखिल मेहरोत्रा ​​हे होते.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT