Petrol-diesel Price Reduce: केंद्रानंतर ‘या’ 9 राज्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात केली कपात
महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांना दिवाळीत केंद्राकडून काहीसा दिलासा देण्यात आला आहे. केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात करत पेट्रोल-डिझेलचे दर अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांनी कमी केले. त्यानंतर केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत 9 राज्यांनी अधिभारात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोल-डिझेलवर आकारण्यात येणारं एक्साईज ड्युटी अर्थात उत्पादन शुल्क अधिभार कमी करण्याचा निर्णय […]
ADVERTISEMENT

महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांना दिवाळीत केंद्राकडून काहीसा दिलासा देण्यात आला आहे. केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात करत पेट्रोल-डिझेलचे दर अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांनी कमी केले. त्यानंतर केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत 9 राज्यांनी अधिभारात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोल-डिझेलवर आकारण्यात येणारं एक्साईज ड्युटी अर्थात उत्पादन शुल्क अधिभार कमी करण्याचा निर्णय घेतला. उत्पादन शुल्क घटवत केंद्राने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 5 रुपये, तर डिझेलच्या दरात 10 रुपयांची कपात केली. केंद्राच्या या निर्णयानंतर विधानसभा निवडणुकांचे वेध लागलेल्या उत्तर प्रदेश, गोव्यासह बिहार, गुजरात, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, उत्तराखंड आणि कर्नाटक सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात आणखी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानसभा निवडणूक असलेल्या उत्तर प्रदेश आणि गोव्यात पेट्रोल आणि डिझेलवरील वॅट (VAT) मध्ये सर्वाधित कपात केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने पेट्रोलवरील वॅटमध्ये 7 रुपये, तर डिझेलवरील वॅटमध्ये 2 रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात पेट्रोल आणि डिझेल 12 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे.
मोदी सरकारचं जनतेला दिवाळी गिफ्ट! उत्पादन शुल्कात कपात केल्याने पेट्रोल-डिझेल उद्यापासून होणार स्वस्त