नागपुरात होम क्वारंटाईनचा नियम मोडाल तर थेट गुन्हा दाखल होणार!
नागपूर: नागपूरमध्ये सातत्याने कोरोना रुग्णांची वाढ दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता नागपूर महानगरपालिकेने एक कठोर निर्णय घेतला आहे. होम क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या ज्या व्यक्ती नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल होणार आहे. तसंच 5000 रुपयांपर्यंत दंड देखील ठोठावला जाणार आहे. गेल्या 24 तासात नागपूरमध्ये तब्बल 1292 रुग्ण आढळून आले आहेत. नागपुरात कोव्हिड-१९ चा […]
ADVERTISEMENT

नागपूर: नागपूरमध्ये सातत्याने कोरोना रुग्णांची वाढ दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता नागपूर महानगरपालिकेने एक कठोर निर्णय घेतला आहे. होम क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या ज्या व्यक्ती नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल होणार आहे. तसंच 5000 रुपयांपर्यंत दंड देखील ठोठावला जाणार आहे.
गेल्या 24 तासात नागपूरमध्ये तब्बल 1292 रुग्ण आढळून आले आहेत. नागपुरात कोव्हिड-१९ चा संसर्ग वाढत चालला आहे. नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने लक्षणे नसलेल्या कोरोना बाधितांना त्यांच्या होम क्वारंटाईनची परवानगी दिलेली आहे. होम क्वारंटाईनमध्ये असले तरी त्यांना कोव्हिड नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र वैद्यकीय आरोग्य विभागाला तक्रारी प्राप्त होत आहे की, होम क्वारंटाईनमध्ये असलेले काही कोरोना बाधित निकषाचे पालन करीत नसून वैद्यकीय निकडीशिवाय इतरत्र बाहेर फिरत आहे. त्या अनुषंगाने सदर बाब ही गंभीर स्वरुपाची आहे. यामधून संसर्ग वाढण्याचा देखील धोका आहे. होम क्वारंटाईन असलेल्या नागरिकांच्या हातावर शिक्का मारण्याचे आदेश सुध्दा प्रशासनाकडून देण्यात करण्यात आले. आहेत.
चिंताजनक, राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 9927 जणांना Corona ची लागण