पत्राचाळ घोटाळ्याला नवं वळण, संजय राऊतांच्या चार्जशीटमध्ये ईडीने केला शरद पवारांचा उल्लेख

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पत्राचाळ घोटाळा प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. याचं कारण आहे ईडीने फाईल केलेली चार्जशीट. ईडीने फाईल केलेल्या संजय राऊत यांच्या चार्जशीटमध्ये शरद पवारांचं नाव आलं आहे. त्यामुळे पत्राचाळ घोटाळा प्रकरणाला नवं वळण लागलं आहे.

ADVERTISEMENT

२००६-०७ मिटिंगचा काय संदर्भ आहे?

२००६-०७ च्या दरम्यान संजय राऊत यांनी काही मिटिंग अटेंड केल्या होत्या. त्यातली एक बैठक तेव्हा केंद्रीय कृषी मंत्री असलेल्या शरद पवारांसोबत झाली होती. तर एक बैठक माजी मुख्यमंत्र्यांसोबत झाली होती. यानंतर या प्रकरणात राकेश वाधवानचा सहभाग स्पष्ट झाला. पत्राचाळ डेव्हलपमेंट संदर्भात हा सहभाग होता. ईडीने हे देखील म्हटलं आहे की प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि त्यांचेच प्रॉक्सी म्हणून काम करत होते. त्यामुळेच त्यांना गुरूआशिष कंपनीत आणण्यात आलं. असा उल्लेख आहे.

२००६-०७ च्या दरम्यान केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार होते. तसंच २००७ मध्ये विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. या दोघांचीही नावं ईडीच्या चार्जशीटमध्ये आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात ही चर्चा सुरू झाली आहे की ईडीच्या आरोपपत्रात ही दोन नावं का आली? तसंच शरद पवार यांच्याशी बैठक झाल्यानंतरच वाधवान हे या सगळ्यामध्ये कसे आले हे समोर आलंय.

हे वाचलं का?

ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात संजय राऊत हेच पत्राचाळ घोटाळ्यातील मास्टरमाईंड असल्याचा दावा करण्यात आला आहे. ईडीने आपल्या आरोपपत्रात खुलासा केला आहे की, पत्राचाळ प्रकरणात राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांनी संगनमताने मनी लाँड्रिंग केली आहे.

प्रवीण राऊत यांच्याकडे महत्त्वाचे अधिकार दिले गेले

प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याने ते कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करू शकत होते तसे अधिकार त्यांना देण्यात आले होते. म्हाडासोबत वाटाघाटी करण्याचं आणि सर्व सरकारी, निमशासकीय आणि स्थानिक प्राधिकरणांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्याची जबाबदारी प्रवीण राऊत यांच्यावर देण्यात आली होती. संजय राऊत यांच्याशी जवळीक असल्याने प्रवीण राऊत यांनी म्हाडामध्ये काम करणाऱ्या बहुतांस सरकारी अधिकाऱ्यांशी विविध फायदे आणि लाभ मिळवण्याच्या हेतूने संपर्क साधला. त्यानंतर एफएसआय बिल्डरला विकला.

ADVERTISEMENT

प्रवीण राऊत, संजय राऊत आणि राकेश वाधवान यांच्यात संगनमत

प्रवीण राऊत, संजय राऊत आणि राकेश वाधवान यांच्यात संगनतमत होतं असंही ईडीने त्यांच्या आरोपपत्रात म्हटलं होतं. पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प ७४० कोटींचा असून त्यात प्रवीण राऊत यांना १८० कोटी मिळाले आहेत असं प्रवीण राऊत यांनी त्यांच्या जबाबात म्हटलं आहे. याचा आधार घेत संजय राऊत यांना या गुन्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पैसे मिळाले असाही अंदाज ईडीने व्यक्त केला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT