गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी समोर आली नवी अपडेट, जाणून घ्या….

मुंबई तक

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोना आणि न्युमोनिया झाल्याने ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची थोडी सुधारणा आहे. मात्र त्याचं वय 92 असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही रिस्क घ्यायची नाही. त्यामुळे त्यांना रूग्णालयात ठेवण्यात आलं आहे. गेल्या शनिवारी त्यांना ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली असली तरीही त्यांचा रूग्णालयातला मुक्काम वाढला आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोना आणि न्युमोनिया झाल्याने ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची थोडी सुधारणा आहे. मात्र त्याचं वय 92 असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही रिस्क घ्यायची नाही. त्यामुळे त्यांना रूग्णालयात ठेवण्यात आलं आहे. गेल्या शनिवारी त्यांना ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली असली तरीही त्यांचा रूग्णालयातला मुक्काम वाढला आहे. लता मंगेशकर यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी मुंबई तकशी बोलताना ही माहिती दिली आहे.

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही चौकशी केली. तसंच गरज पडल्यास मीदेखील रूग्णलयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करेन असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांना कोरोनासोबतच निमोनियानेही ग्रासलं आहे.