पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचं मोदी सरकारला पत्र, लसीकरणाबाबत केली अत्यंत महत्त्वाची मागणी
देशासह महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा व्हेरिएंटचा धोका वाढला आहे. मुंबईतही कोरोनाचे दोन रूग्ण आढळले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारला एक पत्र लिहिलं आहे. पत्रामध्ये त्यांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहून या मागण्या केल्या आहेत. हे पत्र आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर अकाऊंटवर शेअर केलं आहे. […]
ADVERTISEMENT

देशासह महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा व्हेरिएंटचा धोका वाढला आहे. मुंबईतही कोरोनाचे दोन रूग्ण आढळले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारला एक पत्र लिहिलं आहे. पत्रामध्ये त्यांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहून या मागण्या केल्या आहेत. हे पत्र आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर अकाऊंटवर शेअर केलं आहे.
काय म्हटलं आहे आदित्य ठाकरे यांनी?
आदित्य ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रात दोन मागण्या केल्या आहेत. यात लसीकरणासाठी किमान वयोमर्यादा 15 केली पाहिजे. ज्यामुळे महाविद्यालयीन आणि माध्यमिक शाळांमधल्या विद्यार्थ्यांना लस देता येईल. तसंच आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना तिसरा डोस देण्यात यावा म्हणजेच बुस्टर डोस देण्यात यावा अशी मागणीही आदित्य ठाकरेंनी केली आहे.
देशात ओमिक्रॉनमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात दोन गोष्टी सुचवू इच्छितो असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. आपण वेगवेगळ्या डॉक्टरांसोबत चर्चा केली. या चर्चेनंतर वाटतं की लसीकरणाची मर्यादा 18 ऐवजी 15 करण्यात यावी. असा निर्णय घेतला गेला तर महाविद्यालयात जाणारी मुलं आणि उच्च माध्यमिक शाळांमधील मुलांना कवच पुरवता येईल. कोरोना योद्ध्यांना बुस्टर डोस देण्याबाबत संमतीही मागण्यात आली आहे.