राहुल गांधी म्हणाले, ‘आणीबाणी ही चूक होती, पण जे आज होतंय ते…’
नवी दिल्ली: काँग्रेसने आणीबाणी लागू करणे ही ‘चूक’ होती परंतु पक्षाने भारताच्या घटनात्मक चौकटीवर कब्जा करण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. असं वक्तव्य काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वक्तव्य केलं आहे. दरम्यान, अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच गांधी घराण्यातील व्यक्तीने आणीबाणी ही चूक असल्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे आता याचे नेमके पडसाद राजकीय वर्तुळाता कसे उमटतात हे पाहणं […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: काँग्रेसने आणीबाणी लागू करणे ही ‘चूक’ होती परंतु पक्षाने भारताच्या घटनात्मक चौकटीवर कब्जा करण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. असं वक्तव्य काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वक्तव्य केलं आहे. दरम्यान, अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच गांधी घराण्यातील व्यक्तीने आणीबाणी ही चूक असल्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे आता याचे नेमके पडसाद राजकीय वर्तुळाता कसे उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेली आणीबाणी हे चुकीचंच होतं. असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. पण सध्या भारतात जे घडत आहे ते आणीबाणीपेक्षा ‘मूलभूतपणे वेगळे’ आहे. असं म्हणत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) वर निशाणा साधला. आरएसएस आपली माणसं पेरुन स्वतंत्र संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
कॉर्नेल विद्यापीठाचे प्रा. कौशिक बासु यांच्याशी केलेल्या व्हर्च्युअल संवादादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
अधिक वाचा: “भूक, बेरोजगारी, आत्महत्या हे तीन पर्याय मोदी सरकारने ठेवले आहेत”










