Nana Patekar : राजकारणात अजातशत्रू कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे नितीन गडकरी

मुंबई तक

राजकारणात अनेक प्रकारची माणसं असतात. मात्र आपल्या कामावर प्रेम करून आपल्याला हेच खातं हवं असं म्हणत आमच्या भेटींमधला रस्त्यांचा दुवा साधणारे नितीन गडकरी आहेत. राजकारणात अजातशत्रू कसं असावं याचं ते उत्तम उदाहरण आहेत असं मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं आहे. नागपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात नाना पाटेकर यांची उपस्थिती होती. त्यावेळी नितीन गडकरींबाबत बोलताना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राजकारणात अनेक प्रकारची माणसं असतात. मात्र आपल्या कामावर प्रेम करून आपल्याला हेच खातं हवं असं म्हणत आमच्या भेटींमधला रस्त्यांचा दुवा साधणारे नितीन गडकरी आहेत. राजकारणात अजातशत्रू कसं असावं याचं ते उत्तम उदाहरण आहेत असं मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं आहे. नागपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात नाना पाटेकर यांची उपस्थिती होती. त्यावेळी नितीन गडकरींबाबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नागपूरमध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन

नागपूरमध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं थाटात उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं कौतुक केलं. खासदार सांस्कृतिक महोत्सव म्हणजे फक्त मनोरंजन नाही तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचं एक ठिकाण आहे असंही नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले नाना पाटेकर गडकरींविषयी?

मी आज उशिरा आलो त्याचं कारण म्हणजे रणजीत देशमुख यांच्या वडिलांच्या पुतळ्याचं अनावरण होतं. गडकरींनी मला सांगितलं की नाना तुम्ही तिथे जा, ती खूप चांगली माणसं आहेत. तुम्ही त्या कार्यक्रमाला जाऊन या. इथे थोडासा उशीर झाला तरीही चालेल. हे फक्त गडकरीच सांगू शकतात. रणजीत देशमुख हे काँग्रेस पक्षाचे आहेत तरीही गडकरींनी मला हे सांगितलं. राजकारणात अजातशत्रू कसं असलं पाहिजे ही गोष्ट नितीन गडकरींकडून शिकण्यासारखी आहे. मला पुढच्या वर्षी जर जमलं तर मी एखादा कार्यक्रम या ठिकाणी नक्की करेन असंही आश्वासन नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.

संगीत, नाटक, गाणं या सगळं आपल्या आयुष्यातून वगळलं तर आयुष्य कठीण होऊन जाईल. मला तुम्ही खूप मोठा सन्मान दिलात, मी काही फार मोठा नाही असंही नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp