Savarkar Row : …तर राहुल गांधी आज कुठे दिसलेही नसते; सावरकरांवरील टीकेवरून शरद पोंक्षे भडकले
सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलाय, त्याला इतिहास काय माहितीय. जर तो गांधी कुटूंबात जन्मला नसता, तर तो कुठे असता, हे कुणाला कळालं देखील नसतं,अशा स्पष्ट शब्दात शरप पोंक्षे यांनी राहूल गांधींना सुनावले आहे.
ADVERTISEMENT
Sharad Ponkshe on Rahul gandhi Savarkar row : देशासह, महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात आता प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे (sharad ponkshe) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर टीका केली आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलाय, त्याला इतिहास काय माहितीय. जर तो गांधी कुटूंबात जन्मला नसता, तर तो कुठे असता, हे कुणाला कळालं देखील नसतं,अशा स्पष्ट शब्दात शरप पोंक्षे यांनी राहूल गांधींना सुनावले आहे. पोंक्षे पत्रकार परिषदेत बोलत होते.( actor sharad ponkshe criticize rahul gandhi on savarakar row)
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरेंवर टीका
महाविकास आघाडी सोबत अडीच वर्षे सत्तेत (उद्धव ठाकरे) बसले असताना, राहुल गांधी यांनी असंख्यवेळा सावरकरांवर टीका केली. त्यावेळी त्यांनी तोंड उघडलं नाही. इतकी कशी माणसं सत्तेसाठी मुळ तत्वानाच बगल देऊ शकतात, असा सवाल शरद पोंक्षे (sharad ponkshe) यांनी ठाकरेंना केला.तसेच ज्या बाळासाहेबांनी सावरकरांचा गौरव केला, त्यांच्यानंतर पक्षाची अशी अवस्था झाली की ते कॉंग्रेसबरोबरच सत्तेत बसले. मालेगावात पहिल्यांदाच इशारा दिला. त्या इशाऱ्याला काही अर्थ नाही, मात्र त्यांच्या इशाऱ्याने राहूल गांधी घाबरणारा नाही तो बोलतच राहील,असे पोंक्षे (sharad ponkshe) म्हणाले आहेत.
हे ही वाचा : “उद्धव ठाकरे, तुम्ही हिंदुत्व फक्त सोडलंच नाही, तर…”; भाजपने वाचली यादी
शिंदे-फडणवीसांचे कौतुक
स्वातंत्र्यवीर सावकरांचा सतत अपमान होत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवारी राज्यात सावरकर गौरव यात्रा (Savarakar Guarav Yatra) काढणार असल्याची घोषणा केली होती. या यात्रेतून सावरकरांचे विचार राज्यभरात पोहोचवले जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे शरद पोंक्षे यांनी स्वागत केले.
हे वाचलं का?
सावरकर हा सुर्य आहे…तळपणारा, आज 75 वर्ष झाली देशाच्या स्वातंत्र्याला, या 75 वर्षात काँग्रेसवाल्यांनी त्या सुर्यावर इतक्यांदा थुंकण्याचा प्रयत्न केला, परंतु ती थुंकी त्यांच्यात तोंडावर आली,अशी टीका पोंक्षे यांनी कॉंग्रेसवर केली. तसेच जसे गांधी विचार कोणी संपवू शकत नाही तसेच सावरकर विचारही कोणी संपवू शकत नाही,असेही त्यांनी यावेळी म्हटले.
हे ही वाचा : ‘सावरकरांच्या आडून अडाणी गौरव यात्रा’, संजय राऊत शिंदेंसह भाजपवर बरसले
राजकीय नेत्यांना आवाहन
राज्यातील सर्वच पक्षांनी महापुरुषांबाबत गैरवर्तन आणि गैरवागणूक न करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याचे स्वागतं केलं पाहिजे असे शरद पोंक्षे म्हणाले. सगळ्यांनीच हे बंद करावं, हा महाराष्ट्र आपला असा नव्हता.खऱ्या अर्थाने पुरोगामी विचारांचा होता. काय चाललंय…फार गलिच्छ…दुखद आहे…यातना देणारं आहे. त्यामुळे सगळ्यांना हात जोडून विनंती सोशल मीडियावर तुम्हाला अधिकार मिळालाय म्हणून वाटेल ते बोलणं बंद करा, असे आवाहन शरद पोंक्षे (sharad ponkshe) यांनी केले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT