बाबरी पाडली तेव्हा देवेंद्र फडणवीस तर पळून गेले होते, दीपाली सय्यद यांचा खोचक टोला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बाबरी पाडली त्यावेळी मी तिथे होतो असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यानंतर त्यांच्यावर टीकेचे बाण सुरू झाले. संजय राऊत यांनी थेट अडवाणींचा व्हीडिओ ट्विट करत त्यांना सत्य सांगण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीस हे तर १८५७ चा उठाव झाला त्या लढ्यातही सहभागी झाले होते असा टोला लगावला आहे. त्या पाठोपाठ आता दीपाली सय्यद यांनीही फडणवीसांवर टीका केली आहे.

ADVERTISEMENT

बाबरी कुणी पाडली? फडणवीस म्हणाले मी होतो, संजय राऊत यांनी थेट दाखवला ‘सामना’

काय म्हणाल्या आहेत दीपाली सय्यद?

हे वाचलं का?

“बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा देवेंद्र फडणवीस कुठे होते? ते तर पळून गेले होते. एवढंच काय त्यावेळी अमित शाह आणि मोदीही नव्हते. बाबरी पाडली गेली तेव्हा तिथे हिंदू आणि हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच होते. हे सगळ्या महाराष्ट्राला आणि जगाला माहित आहे. त्यामुळे फडणवीस काय म्हणतात त्याने काही होणार नाही. ते म्हणाले की मी तिथे होतो तर तसं अजिबात नाही.”

१८५७ च्या लढ्यातही देवेंद्र फडणवीस यांचं मोठं योगदान होतं, आदित्य ठाकरेंचा टोला

ADVERTISEMENT

काहीही झालं तरीही फडणवीसांना राष्ट्रपती राजवट आणायची आहे. दंगली झाल्या तरीही बेहत्तर असं काल राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेही भाजपचाच अजेंडा पुढे घेऊन चालले आहेत असंच दिसतं आहे. दंगली झाल्या तर हिंदू आणि मुस्लिम समाज होरपळणार आहे. जेव्हा दंगली होतात तेव्हा सामान्य माणूस होरपळतो हे भाजपने आणि राज ठाकरेंनी लक्षात घेतलं पाहिजे. काही कारण नसताना हे मुद्दे घेतले जात आहेत.

ADVERTISEMENT

भाजपच्या आधाराशिवाय मनसे चालू शकत नाही. राज ठाकरे यांच्या सभेत महागाईचा, पेट्रोल डिझेलचा किंवा बेरोजगारीचा प्रश्न कुठेच मांडला नाही. त्यांनी फक्त टीका केली. भाजप आणि मनसे यांना काय साधायचं आहे यातून हे सगळ्यांना कळतं आहे असंही दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले होते फडणवीस?

“यांना वाटतं हेच महाराष्ट्र आहेत, यांना वाटतं हेच मराठी आहेत. यांना वाटतं यांचंच हिंदुत्व आहे. काय म्हणाले परवा? बाबरी मशिद पडली तेव्हा कुठल्या बिळात होते? कुणीतरी फार चांगला प्रश्न या ठिकाणी विचारला मशिदीवरचे भोंगे काढायला सांगितले तर हातभर फाटली आहे, हे सांगतात आम्ही बाबरी पाडली. बाबरी ढाचा होता, पारतंत्र्यांचा ढाचा होता. तो ढाचा पाडण्याचं काम करणारे कारसेवक होते. आम्हाला याचा अभिमान आहे. ढाचा पाडला तेव्हा तुम्ही कुठे होतात? विचारताय ना मी अभिमानाने सांगतो होय मी ढाचा पाडण्यासाठी त्याच ठिकाणी होतो. देवेंद्र फडणवीस ढाचा पाडण्यासाठी होता. कारसेवेवेमध्ये राम मंदिरासाठी बदायूच्या जेलमध्ये मी घालवले आहेत. लाठी-गोळी खाण्याचं काम आम्ही केलं आणि तुम्ही विचारता आम्ही कुठे? बाबरी पडली तेव्हा महाराष्ट्रातला कुठला नेता गेला होता? शिवसेनेचा एकही नेता हजर नव्हता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT