शिंदे गटाने वेटिंगवर ठेवलेल्या दीपाली सय्यद अडचणीत; माजी स्वीय सहाय्यकाचे गंभीर आरोप
सांगली : शिवसेनेच्या ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या आणि शिंदे गटातने प्रवेशासाठी वेटिंगवर ठेवलेल्या अभिनेत्री दीपाली सय्यद चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. दीपाली सय्यद यांनी अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला, लग्न होऊन अपत्य झालेल्या जोडप्यांची पुन्हा लग्न लावून सामुदायिक विवाह सोहळा दाखविला असा गंभीर आरोप त्यांचे माजी स्वीयसहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला. ते बुधवारी माध्यमांशी बोलत होते. […]
ADVERTISEMENT
सांगली : शिवसेनेच्या ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या आणि शिंदे गटातने प्रवेशासाठी वेटिंगवर ठेवलेल्या अभिनेत्री दीपाली सय्यद चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. दीपाली सय्यद यांनी अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला, लग्न होऊन अपत्य झालेल्या जोडप्यांची पुन्हा लग्न लावून सामुदायिक विवाह सोहळा दाखविला असा गंभीर आरोप त्यांचे माजी स्वीयसहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला. ते बुधवारी माध्यमांशी बोलत होते.
ADVERTISEMENT
भाऊसाहेब शिंदे यांनी काय आरोप केले?
माध्यमांना माहिती देताना शिंदे म्हणाले, दीपाली सय्यद यांनी महाराष्ट्रात दीपाली भोसले-सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हजारो कोटींची मदत केली. परंतु जेव्हा ऑडिट रिपोर्ट माझ्याकडे आले तेव्हा माझ्या लक्षात आलं की, ३१ मार्च २०१८ अखेर ९ हजार १८२ रुपये त्यांच्या खात्यावर शिल्लक होते.
फक्त ९ हजार रुपये शिल्लक असताना देखील दीपाली सय्यद यांनी हजारो कोटींची मदत कशी केली? असा सवाल करत दीपाली सय्यद यांचं पाकिस्तानी आणि दुबईशी काय कनेक्शन आहे हे आर्थिक गुन्हे शाखेनं शोधलं पाहिजे अशीही मागणी शिंदे यांनी केली.
हे वाचलं का?
अन्यथा आत्मदहन करणार :
तसंच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे येत्या आठ दिवसांमध्ये दीपाली सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून झालेली कोट्यावधी रुपयांची चौकशी आपण करावी, अन्यथा मी तुमच्या सागर बंगल्यासमोर आत्मदहन करणार आहे, असा इशाराही शिंदे यांनी दिला.
दीपाली सय्यद यांनी खोटी लग्न लावली :
त्यानंतर ९-९-२०२१ रोजी दीपाली सय्यद यांनी सांगलीमध्ये बोगस मुलींची लग्न लावली. यात काही मुलींचं लग्न २०१६ पूर्वी झालं होतं. त्या मुलींना २०१८ मध्ये अपत्यही झालं होतं. त्याची पुरावाही माझ्याकडे आहे. दीपाली सय्यद यांनी ही लग्न ९-९-२०२१ ला पुन्हा लावून दिली, असाही आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केला.
ADVERTISEMENT
दीपाली सय्यद वेटिंगवर :
गत १३ नोव्हेंबर रोजी दीपाली सय्यद आणि ठाकरे गटाच्या आक्रमक उपनेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे अडसरकर यांचा शिंदे गटात प्रवेश कार्यक्रम निश्चित झाला होता. मात्र ऐनवेळी सय्यद यांचा कार्यक्रम रद्द करुन केवळ केवळ वैजनाथ अडसकर यांचाच पक्षप्रवेश पार पडला. तेव्हापासून दीपाली सय्यद यांना शिंदे गटाने प्रवेश करण्यासाठी वेटिंगवर ठेवलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT