अभिनेत्री केतकी चितळेचं काही खरं नाही, अडचणीत आणखी वाढ
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर विकृत पोस्ट शेअर करुन वाद ओढावून घेतलेल्या अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत आता बरीच वाढ होताना दिसत आहे. आधीच तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेल्या केतकी चितळे हिच्याविरोधात आता राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत. काल दिवसभरात केतकीविरोधात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे केतकी ही अधिक […]
ADVERTISEMENT

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर विकृत पोस्ट शेअर करुन वाद ओढावून घेतलेल्या अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत आता बरीच वाढ होताना दिसत आहे. आधीच तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेल्या केतकी चितळे हिच्याविरोधात आता राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत.
काल दिवसभरात केतकीविरोधात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे केतकी ही अधिक अडचणीत आली आहे. दोन गुन्हे पिंपरी-चिंचवडमध्येच दाखल झाले आहेत. तर एक गुन्हा उस्मानाबादमध्ये दाखल झाला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये केतकीवर दोन गुन्हे दाखल
जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान यांनी दिलेल्या तक्रारीवरून केतकी चितळे हिच्यावर देहू रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल संत तुकाराम महाराज संस्थान कडून देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. एकट्या पिंपरी-चिंचवड मध्येच एकूण दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
उस्मानाबादमध्येही गुन्हा दाखल
दुसरीकडे वादग्रस्त पोस्ट प्रकरणी केतकी चितळेविरोधात उस्मानाबादमध्ये देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशनमध्ये केतकी चितळे हिच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून याबाबत रोहित बागल यांनी गुन्हा नोंद करण्याची तक्रार दिली होती. त्यानुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भादंवि 1860 कलम 505(2), 500, 501, 153-A याद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
शुक्रवारी रात्री केतकी चितळेने एक फेसबुक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये शरद पवारांविषयी आक्षेपार्ह कविता पोस्ट केली. त्यानंतर केतकी चितळेवर पोलिसांनी कारवाई करत तिला अटक केली आहे.
शरद पवारांबाबत विकृत पोस्ट शेअर करणारी केतकी चितळे याआधी किती वेळा बरळलीय?
केतकीने पोस्ट केलेली पोस्ट
“तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll
-अॅड. नितीन भावे (Advocate Nitin Bhave)
ही कविता केतकीने पोस्ट केली. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. तिच्यावर मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली.