अभिनेत्री स्वरा भास्कर कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियावर दिली माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आपल्या ट्विटसमुळे आणि बोल्ड अभिनयामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री स्वरा भास्कर कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे. स्वराने इंस्टाग्राम पोस्ट लिहून यासंदर्भातली माहिती दिली आहे. स्वरा भास्कर आणि तिचे कुटुंबीय कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आपल्याला डोकेदुखी आणि ताप अशी लक्षणं जाणवत होती. टेस्ट केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली आहे असं स्वराने म्हटलं आहे. तसंच माझ्या कुटुंबीयांनाही कोरोना झाला आहे असंही स्वरा भास्करने स्पष्ट केलं आहे.

ADVERTISEMENT

स्वरा भास्करने आपल्या ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजवर कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. काही दिवसांपासून मला ताप आणि डोकेदुखी जाणवत होती. त्यानंतर कोरोनाची चाचणी केली ती पॉझिटिव्ह आली. माझी चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर कुटुंबीयांनीही चाचणी केली. त्यांनाही कोरोना झाला आहे. सगळ्या चाहत्यांना तिने मास्क घालण्याचं आणि काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

कोरोनाचा विळखा होतोय घट्ट, 70 आमदार आणि 15 मंत्र्यांना कोरोना संसर्ग-राजेश टोपे

हे वाचलं का?

स्वरा भास्कर तिच्या पोस्टमध्ये म्हणते, हॅलो कोव्हिड, आता मला माझा आरटीपीसीआर रिपोर्ट मिळाला आहे. मी कोव्हिड पॉझिटिव्ह आहे. मी स्वतःला आयसोलेट केलं आहे. ताप, डोकेदुखी आणि चव जाणे ही लक्षणं मला जाणवत आहेत. मी दोन्ही लसी घेतल्या होत्या तरीही कोरोना झाला आहे. आता लवकरच सगळं काही ठीक होईल अशी आशा आहे. कुटुंबीयांचे मी आभार मानते. मी घरीच आहे, सगळ्यांनी घरीच राहा आणि सुरक्षित राहा.

स्वरा भास्कर तिच्या कुटुंबीयांसोबत दिल्लीत राहते. 5 जानेवारीला तिला ताप आणि डोकेदुखी ही लक्षणं जाणवत होती. त्यानंतर तिने चाचणी केली ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. स्वराचं कुटुंबही आयसोलेशनमध्ये आहे. सगळ्यांना कोरोनाची लक्षणं आहेत. स्वरा भास्करच्या आधी अभिनेता जॉन अब्राहम, मृणाल ठाकूर, अलाया एफ, एकता कपूर या सगळ्यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT