Tanaji Sawant: ‘Aaditya ठाकरेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये..’, सावंतांची बोचरी टीका
Tanaji Sawant has made a venomous criticism: सोलापूर: राज्याचे माजी पर्यटन मंत्री आणि शिवसेना (UBT) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर शिंदे गटाकडून (Shinde Group) वारंवार टीकेची झोड उठवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) वरळीतून (Worli) निवडणूक लढविण्याचं आव्हान दिलं होतं. ज्यानंतर त्यांच्यावर शिंदे गटाचे आमदार आणि […]
ADVERTISEMENT
Tanaji Sawant has made a venomous criticism: सोलापूर: राज्याचे माजी पर्यटन मंत्री आणि शिवसेना (UBT) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर शिंदे गटाकडून (Shinde Group) वारंवार टीकेची झोड उठवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) वरळीतून (Worli) निवडणूक लढविण्याचं आव्हान दिलं होतं. ज्यानंतर त्यांच्यावर शिंदे गटाचे आमदार आणि नेते सातत्याने टीका करत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आदित्य ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. (aditya thackeray will be admitted to mental hospital tanaji sawants criticism)
ADVERTISEMENT
‘आदित्य ठाकरेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करू’, असं म्हणत तानाजी सावंत यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ते सोलापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते.
पाहा तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले:
आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या आव्हानाबाबत जेव्हा पत्रकारांनी मंत्री तानाजी सावंत यांना सवाल विचारला तेव्हा त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘सध्या माझ्याकडे आरोग्य खाते आहे. माझ्याकडे सध्या चारच मेंटल हॉस्पिटल्स आहेत. या ठिकाणी कुठे जागा शिल्लक असेल तर त्याठिकाणी त्यांची नक्कीच नियुक्ती केली जाईल. ज्यांच्या मेंदूवर परिणाम झालेला असेल, त्यांना ताबडतोब वेड्यांच्या दवाखान्यात दाखल करावे, असा सल्ला मी आमच्या मुख्यमंत्र्यांना देणार आहे. अशा पद्धतीने आपण आदित्य ठाकरेंना वेड्याच्या रुग्णालयात दाखल करू.’ अशी टीका तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे. त्याचबरोबर कसबा व चिंचवडमधील दोन्ही उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील. असा विश्वासही मंत्री सावंत यांनी व्यक्त केला.
हे वाचलं का?
तानाजी सावंत यांना जाहीरपणे न बोलण्याच्या सुचना? सर्वच प्रश्नांवर मौनाची भूमिका
शंभूराज देसाईंनीही साधला होता आदित्य ठाकरेंना निशाणा
ADVERTISEMENT
आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका करताना वरळीतून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिल्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनीही आदित्य आदित्य ठाकरेंवर टीका केली होती
ADVERTISEMENT
शंभूराज देसाई म्हणाले होते की, ‘आदित्य ठाकरे सातत्याने टीका करत असतात. आता तर त्यांनी वरळी मतदारसंघातून एकनाथ शिंदेंनी निवडून येऊन दाखवावं, असं आव्हान दिलं आहे. मुळात आदित्य ठाकरेंना निवडून यायला तेथील विद्यमान आमदार सुनील शिंदेंचं तिकिट कट करावं लागलं होतं. त्यावेळी सुनील शिंदेंना व सचिन अहिर या दिग्गजांना विधान परिषदेवर घ्यावं लागलं.’
Maharashtra Politics : आदित्य ठाकरे देसाईंचं आव्हान स्वीकारणार का?
‘एका आदित्य ठाकरेंना निवडून आणण्यासाठी दोन आमदारक्या पक्षाला द्याव्या लागल्या. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना आव्हान देणं हास्यास्पद आहे. शिंदेसाहेब लांब राहू देत, आम्ही कार्यकर्ते आहोत. पुन्हा निवडणूक लावायची तयारी असेल, तर त्यांनी पाटणमध्ये येऊन विधानसभेची निवडणूक लढवावी आणि निवडून येऊन दाखवावं. ज्यांच्या मागे 50 आमदार व 13 खासदार आहेत त्यांना आव्हान देण्याची भाषा करु नये.’, असं आव्हान देसाई यांनी आदित्य ठाकरेंना दिलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT