राहुल गांधी म्हणाले चूक झाली आणि महाराष्ट्रात राजकारण पेटलं!
मुंबई: ‘आणीबाणी लावणं ही ‘चूक’ होती,’ अशी स्पष्टपणे कबुली दिल्यानंतर आता याचे राजकीय पडसाद हे आता महाराष्ट्रात उमटत आहेत. कारण राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी असं म्हटलं आहे की, ‘भाजपने देखील दिल्ली दंगलीबाबत माफी मागावी.’ याशिवाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील असं म्हटलं आहे की, आता ‘गोध्राबद्दल भाजप […]
ADVERTISEMENT

मुंबई: ‘आणीबाणी लावणं ही ‘चूक’ होती,’ अशी स्पष्टपणे कबुली दिल्यानंतर आता याचे राजकीय पडसाद हे आता महाराष्ट्रात उमटत आहेत. कारण राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी असं म्हटलं आहे की, ‘भाजपने देखील दिल्ली दंगलीबाबत माफी मागावी.’ याशिवाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील असं म्हटलं आहे की, आता ‘गोध्राबद्दल भाजप सरकारने माफी मागावी.’ त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणावरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये पुन्हा जुंपण्याची शक्यता आहे.
दिल्ली दंगल चूक होती हे भाजपने स्वीकारावं: नवाब मलिक
’45 वर्षांनंतर राहुल गांधी यांनी स्वीकारलं आहे की आणीबाणी ही चूक होती. दिल्ली दंगलीबाबत देखील काँग्रेसने माफी मागितली होती. त्याचप्रमाणे आता वर्षभरापू्र्वीच झालेली दिल्ली दंगल ही चूक होती हे भाजपने देखील स्वीकारावं.’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे.
ग्रोधाबद्दल भाजप सरकारने माफी मागावी: नाना पटोले