ST संपामुळे पगार नाही असं सांगून वडील आंदोलनात गेले, मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
विजयकुमार बाबर, प्रतिनिधी, सोलापूर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी व्हायचे आहे असे सांगून वडिलांनी घर सोडले अन् इकडे मुलानं आईची साडी गळ्याला गुंडाळून आपली जीवनयात्रा संपविली. त्याआधी त्याने वडिलांकडे खर्चासाठी पैसे मागितले होते. अमर तुकाराम माळी (वय २० रा. कोंडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. हा दुर्दैवी प्रकार बुधवारी दुपारच्या सुमारास घडला. यासंबंधीची नोंद सोलापूरच्या […]
ADVERTISEMENT
विजयकुमार बाबर, प्रतिनिधी, सोलापूर
ADVERTISEMENT
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी व्हायचे आहे असे सांगून वडिलांनी घर सोडले अन् इकडे मुलानं आईची साडी गळ्याला गुंडाळून आपली जीवनयात्रा संपविली. त्याआधी त्याने वडिलांकडे खर्चासाठी पैसे मागितले होते. अमर तुकाराम माळी (वय २० रा. कोंडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. हा दुर्दैवी प्रकार बुधवारी दुपारच्या सुमारास घडला. यासंबंधीची नोंद सोलापूरच्या सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.
अमर माळी याचे दयानंद महाविद्यालयात 12 वीपर्यंत शिक्षण झाले आहे.तो गेल्या काही दिवसात शांत शांत बसत होता. बुधवारी सकाळी त्याने वडील तुकाराम माळी यांना पैशाची मागणी केली होती. वडिलांनी माझे काम दोन,तीन महिने झाले बंद आहे,मला पगार नाही,तुला पैसे कुठून देऊ असे त्याला म्हणाले होते.बोलणे झाल्यानंतर वडील एसटीचे आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी गेले.
हे वाचलं का?
इंदापूर: टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून नववीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या
अमरदेखील घराबाहेर गेला,त्यानंतर तो दुपारी घरी आला. घरात आई आणि त्याची चुलती जेवण करत होते.आईने त्याला जेवण्यासाठी आग्रह केला,मात्र तो नको म्हणत थोडा आराम करतो म्हणून स्वतःच्या खोलीत गेला.बराच वेळ झाले तरी तो बाहेर आला नाही म्हणून आईने त्याला आवाज दिला. मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे त्या खोलीजवळ गेल्या.आवाज देऊ लागल्या, मात्र काहीच आवाज येत नव्हता,आतून कडी लावण्यात आली होती. मोठ्या भावानेही आवाज दिला, शेवटी खिडकीतून पाहिले असता अमर साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.
ADVERTISEMENT
पंढरपूर: सावकाराच्या जाचाला कंटाळून 27 वर्षीय तरुणाची आत्महत्या
ADVERTISEMENT
भावाने दरवाजा तोडून आत प्रवेश केला अमरला खाली उतरवले.अमरला पाहताच आईने हंबरडा फोडला.त्याला उपचारांसाठी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
वडील आंदोलनामध्ये होते त्यांना त्यांच्या भावाने फोन करून घरी बोलावून घेतले. तुकाराम माळी हे घरी आले असता त्यांना मुलाने आत्महत्या केल्याचे समजले.अमर हे तू काय केलेस ? माझा पगार झाला नसल्याने तुला पैसे नाही म्हणालो होतो. असे म्हणत ते ओक्साबोक्शी रडू लागले. अमर याचे 12 सायन्स पर्यंतचे शिक्षण झाले होते.तो अभ्यासात हुशार होता त्याने असे कसे काय केले हे कळत नाही अशी चर्चा त्याच्या मित्रांमध्ये आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT