Ahmednagar Accident : नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू
नगर कल्याण महामार्गावर उस वाहतूक करणारा ट्रक, ठाणे – मेहकर एस.टी बस आणि इको गाडी यांचा अपघात झाल्याची घटना घडली होती. हा अपघात इतका भीषण होता की गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर झाला होता.
ADVERTISEMENT
Ahmednagar Accident News : रोहित वाळके, अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या घटनेत ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर, ठाणे मेहकर एसटी बस आणि इको गाडी यांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ढवळपुरी फाटया नजीक आज बुधवारी पहाटे 2.30 वाजता ही भीषण अपघाताची घटना घडली आहे. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सूरू आहे. या घटनेने अहमदनगरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. (ahmednagar accident news truck bus and car accident nagar kalyan highway 6 people killed shocking story)
ADVERTISEMENT
नगर कल्याण महामार्गावर उस वाहतूक करणारा ट्रक, ठाणे – मेहकर एस.टी बस आणि इको गाडी यांचा अपघात झाल्याची घटना घडली होती. हा अपघात इतका भीषण होता की गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर झाला होता. ढवळपुरी फाटया नजीक आज बुधवारी पहाटे 2.30 वाजता ही भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात ६ जण जागीच ठार झाले आहेत. तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे.
हे ही वाचा : ‘लबाड लांडग्यांने वाघाचे कातडे पांघरले म्हणजे तो…’, शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार
या अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक प्रमोद वाघ व टिम घटनास्थळी दाखल झाली होती. यावेळी पाच मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात तर एकाला अहमदनगर येथे उपचाराखातर दाखल करताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. या घटनेनंतर अपघात ग्रस्त वाहने बाजुला करत वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. दरम्यान अपघातग्रस्तांची ओळख पटविण्याचे काम सूरू आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा : Uddhav Thackeray : आशिष शेलारांची ठाकरेंवर जोरदार टीका, ‘वाचाळवीरांची…’
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT