अहमदनगर : नवोदय विद्यालयात कोरोनाचा उद्रेक; 19 विद्यार्थी आढळले कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील 19 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा, श्रीरामपूर, अहमदनगर येथील विद्यार्थ्यांचा समावेश यामध्ये आहे.

ADVERTISEMENT

दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी नवोदय विद्यालयामध्ये बाहेरून आले होते. या विद्यार्थ्यांकडून संसर्ग झाला असावा, अशी शक्यता नवोदय विद्यालयाच्या प्रशासनासह पारनेर आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.

Omicron : महाराष्ट्रात दिवसभरात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 20 नवे रूग्ण, एकूण संख्या 108

हे वाचलं का?

या नवोदय विद्यालयातील 9 विद्यार्थ्यांना गुरुवारी कोरोना सदृश्य लक्षणं आढळून आली. त्यांची तपासणी टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली.

नवोद्य विद्यालयातील विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं तपासणीत आढळून आल्यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांच्या शुक्रवारी सकाळी चाचण्या करण्यात आल्या.

ADVERTISEMENT

यात आणखी 10 विद्यार्थ्यांना आणि एका संगीत शिक्षकाला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं. या सर्व कोरोनाबाधित रुग्णांना पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयातील कोव्हिड सेंटरमध्ये आरोग्य विभागाने दाखल केलं.

ADVERTISEMENT

Covid 19 : महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रूग्णांमध्ये मोठी वाढ, 12 मृत्यूंची नोंद

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, गटविकास अधिकारी किशोर माने यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश लाळगे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश लोंढे, डॉ. अन्विता भांगे, डॉ. स्वाती ठुबे यांच्यासह आरोग्य विभागाच्या पथकाने तातडीने 410 चाचण्या सुरू केल्या. दरम्यान, जवाहर नवोदय विद्यालयात कोरोनाचा शिरकाव झाल्यानं विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT