औपचारिकता पूर्ण ! Air India चा ताबा टाटा उद्योग सुमहाकडे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

केंद्र सरकारने गुरुवारी एअर इंडियाचा ताबा अधिकृतरित्या टाटा उद्योग सुमहाकडे सोपवला आहे. टाटा उद्योग समुहाने एअर इंडियासाठी बोली लावली होती. यानंतर काही औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर आजपासून एअर इंडियाचं बोधचिन्ह असलेला महाराजा आता टाटा उद्योग समुहाचा झाला आहे. केंद्र सरकारने एअर इंडियातले आपले १०० टक्के समभाग टाटा उद्योगसमुहाच्या नावे केले आहेत.

ADVERTISEMENT

या प्रक्रीयेसाठी आज सकाळी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर मालकी हस्तांतरण प्रक्रियेचा मुहूर्त चुकल्याची देखील चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे आज ही प्रक्रिया पूर्ण न होता उद्या होणार असल्याचं सांगितलं गेलं. मात्र, अखेर केंद्र सरकारने यासंदर्भातली अधिकृत घोषणा केली असून आता एअर इंडिया अधिकृतरित्या टाटा उद्योग समुहाच्या स्वाधीन झाली आहे.

असा झाला संपूर्ण व्यवहार –

हे वाचलं का?

एअर इंडिया कर्जबाजारी झाल्यानंतर आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना केंद्र सरकारने एअर इंडियामधून १०० टक्के निर्गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. टाटा उद्योगसमुहाने यासाठी लावलेली १८ हजार कोटींची बोली अखेर अंतिम करण्यात आली होती. परंतू, यावेळी एअर इंडियावर तब्बल १५ हजार ३०० कोटींचं कर्ज होतं. या कर्जाची रक्कम वगळता उरलेले २ हजार ७०० कोटी रुपये रोख स्वरूपात केंद्र सरकारला अदा करण्याचं टाटा सन्सनं मान्य केलं. गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, व्यापारमंत्री पियुष गोयल आणि नागरी हवाईउड्डाण वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी एअर इंडियाच्या या व्यवहाराला ४ ऑक्टोबरला मंजुरी दिली होती.

कालांतराने एअर इंडियाने विविध टप्प्यांमध्ये केंद्र सरकारला २७०० कोटींची रक्कम अदा केली. यानंतर केंद्र सरकारने १०० टक्के शेअर्स टाटा सन्स आणि भागीदार कंपनी असलेल्या टेलेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांकडे हस्तांतरीत केले आहेत. त्यामुळे आज अखेर एअर इंडियाची मालकी हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT