जयंत पाटील-अजित पवारांमध्ये भाषणावरुन नाराजीनाट्य? शरद पवारांसमोर नेमकं काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन रविवारी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये पार पडले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह देशातील आणि महाराष्ट्रातील अनेक बडे नेते या अधिवेशनाला उपस्थित होते. तसेच राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते याठिकाणी पोहचले होते. मात्र या संपूर्ण अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या न झालेल्या भाषणाची चांगलीच चर्चा रंगली.

ADVERTISEMENT

नेमके काय घडले?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाच्या व्हिडीओमध्ये दिसून येत असल्याप्रमाणे सुरुवातीला प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, फौजिया खान अशा राज्यातील नेत्यांसोबत केरळ, लक्षद्वीप, हरयाणा, उत्तरप्रदेश अशा विविध राज्यातील पदाधिकाऱ्यांची भाषण झाली. मात्र अजित पवार यांचे नाव भाषणासाठी पुकारण्यात येत नव्हते.

अखेरीस शरद पवार यांच्या भाषणापूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी माईक हातात घेवून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दोन मिनिटांमध्ये मनोगत मांडण्याची विनंती केली. यावेळी कार्यकर्त्यांमधून अजित पवार यांना बोलायला द्या अशी मागणी करण्यात आली. तसेच अजित पवार यांच्या नावाच्या समर्थनाच्या घोषणाही देण्यात आल्या. मात्र प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांनाच भाषण करण्यास सांगितले.

हे वाचलं का?

जयंत पाटील भाषणासाठी माईकसमोर उभे राहिल्यानंतरही अजित पवार यांच्याच नावाच्या घोषणा सुरुच होत्या. यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले, एक-एक स्टेशन येतं असतं. परंतु जयंत पाटील यांचे भाषण सुरु होताच अजित पवार व्यासपीठावरुन खाली आले आणि थेट सभागृहाच्या बाहेरच निघून गेले. जयंत पाटील यांचे भाषण झाल्यानंतर पॉप्युलर डिमांडवर अजित पवार यांना भाषणाची संधी देत आहोत, असं प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले. मात्र तेव्हा अजित पवार व्यासपीठावर नव्हते.

त्यावर अजित पवार कुठे गेले असा प्रश्न पटेल यांनी विचारला. मात्र ते उपस्थित नसल्याचे लक्षात येताच पटेल कार्यकर्त्यांच्या दिशेने बोट करुन म्हणाले, तुम्ही आधीच अजितदादा अजितदादा केले. ते आधी बसून होते. तुमच्यामुळे ते लवकर बाहेर पडले. त्यानंतर अजित पवार वॉशरुमसाठी गेले असल्याचं पटेल यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले, बोलवू आपण त्यांना, तोपर्यंत राष्ट्रवादीच्या युवक आणि विद्यार्थी काँग्रेसच्या नवीन झेंड्याचे लोकार्पण करु. ५ मिनिटांमध्ये झेंड्याचे लोकार्पण पार पडल्यानंतर मात्र त्यांनी थेट शरद पवार यांना भाषणाची विनंती केली. यावेळीही अजित पवार यांच्या नावाच्या घोषणा सुरुच असल्याचं दिसून येत आहे. या दरम्यानच्या काळात पडद्यामागे सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र ते परतले नाहीत असेही सांगण्यात येते.

ADVERTISEMENT

दरम्यान या सगळ्या प्रकारावर बोलताना अजित पवार म्हणाले, यात बरीच भाषण झाली. शेवटी हे राष्ट्रीय अधिवेशन वेगवेगळ्या राज्यातील मान्यवरांनीही त्यांची मत, विचार मांडायची असतात. महाराष्ट्रातून डॉ. अमोल कोल्हे, छगन भुजबळ, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, स्वतः शरद पवार अशा अनेक दिग्गजांनी भाषण केली. लक्षद्वीप, केरळ, हरयाणा, बिहार, उत्तरप्रदेश इथल्या आमच्या सहकाऱ्यांनी मत मांडली. शेवटी हे महाराष्ट्राच्या राष्ट्रवादीचे अधिवेशन नव्हते. त्यामुळे मी काही बोललो नाही ही वस्तुस्थिती आहे. मी महाराष्ट्रात बोलेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT