कोरोना आहे काळजी घ्या म्हणतात अन् मंत्र्यांना यात्रा काढायला सांगतात -अजित पवार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर नव्याने मंत्री झालेल्या भाजप नेत्यांच्या नेतृत्वात राज्यात जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच या यात्रा सुरू आहेत. दुसरीकडे केंद्राने राज्य सरकारला काळजी घेण्याचा सल्ला दिला असून, अजित पवारांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला.

उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी विविध विषयावर संवाद साधला. यावेळी त्यांनी नारायण राणे व भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर टीका केली.

‘मला नारायण राणेंबाबत चर्चा करायची नाही, त्यांच त्यांना लखलाभ. आम्हाला सरकार चालवायचं आहे. ते केंद्रात मंत्री आहेत; त्यांनी त्याच काम करावं’, असं म्हणत अजित पवारांनी जास्त बोलणं टाळलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘आपल्याकडे अनेक सण आनंदाने करतात. पण एकीकडं केंद्र सरकार सांगतंय की, कोरोना आहे काळजी घ्या आणि नवीन चार मंत्री झाले, त्यांना सांगतात यात्रा काढा नंतर कोरोना वाढला तर याला कोण जबाबदार? याचा विचार केंद्राने करायला हवा. जिथं राजकारण करायचं आहे, तिकडे सगळे राजकारण करू; पण जिथं जनतेचा प्रश्न आहे, तिथे सर्व राजकीय पक्षांनी एकत्र काम केलं पाहिजे. त्यामुळे सण साजरे करताना काळजी घ्यावी’, असं अजित पवार म्हणाले.

‘मला अनिल देशमुखांबाबत रिपोर्ट मिळत नाही, तोपर्यंत मी यावर बोलणार नाही. अनेक चौकशा होत असतात. त्यावेळी सगळे चौकशीसाठी मदत करत असतात. त्यामुळे मी यावर बोलणार नाही’, असं मत अजित पवार यांनी मांडलं.

ADVERTISEMENT

‘पीएमआरडीएबाबत पार पडली. एक बैठक मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झाली होती. त्याबाबतीत आज खासदार आमदारांना एक ड्राफ्ट दाखवला. अनेकांनी सूचना केल्या आहेत. अजून एक बैठक मुख्यमंत्री स्तरावर होणार आहे. त्यानंतर त्यातील अनेक मागण्याबाबत चर्चा होईल. पुण्याच्या आजूबाजूचा परिसर वाढतच आहे, त्यामुळं भविष्यात जर नवीन महापालिका करायची झाली तर त्याबाबत नियोजन करायचं अशी चर्चा झाली’, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

ADVERTISEMENT

‘२३ गावाबाबत आता जरी पीएमआरडीने केलं असेल, तर ते पुणे महापालिकाकडे हस्तांतरण करायचं असेल तर याबाबत पुणे महापालिका बघेल. दोन्ही महापालिका भाजपच्या ताब्यात असल्या तरी विकासाबाबत राजकारण केलं जातं नाही. याबाबत मुख्यमंत्री ही सकारात्मक आहेत’, अजित पवार म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT