यामागचा मास्टरमाईंड कोण?; शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यावरून अजित पवार संतापले
कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक होत असून, महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत उपमुख्यमंत्र अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घराबाहेर केलेल्या आंदोलनावरून संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या मागणीवरून राज ठाकरेंनाही उलट सवाल केला. अजित पवार म्हणाले, “ग्लोबल वार्मिंगचं संकट म्हणजे काय, हे आता महाराष्ट्राला आणि देशाला कळायला लागलं आहे. उद्धव […]
ADVERTISEMENT

कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक होत असून, महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत उपमुख्यमंत्र अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घराबाहेर केलेल्या आंदोलनावरून संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या मागणीवरून राज ठाकरेंनाही उलट सवाल केला.
अजित पवार म्हणाले, “ग्लोबल वार्मिंगचं संकट म्हणजे काय, हे आता महाराष्ट्राला आणि देशाला कळायला लागलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही वेगवेगळे निर्णय घेत आहोत. कोरोनाची दोन वर्ष अडचणीची गेली. त्यातही राज्याच्या विकासाला खिळ न बसू देण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलं. काल मंत्रिमंडळ बैठकीवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला म्हणाले, की मलाही सभेला जायचं आहे, पण ऑपरेशनमुळे प्रवास करू शकत नाही. त्यामुळे आज आम्ही सगळे त्यांचा सांगावा घेऊन कोल्हापुरात आलेलो आहोत,” असं अजित पवार यांनी सांगितलं.
“ही निवडणूक नियतीने आपल्यावर लादलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी मागच्या निवडणुकीत जाधवांना निवडून दिलं. काही राजकीय समीकरण बदलली. सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी केली. बऱ्याच जणांना वाटतं होतं हे तिघे एकत्र येतील का? महाराष्ट्राच्या भल्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र आले. त्यातून एक पुरोगामी विचार पुढे न्यायचा होता. महाराष्ट्राचे विकासाचे प्रश्न सोडवायचे होते. सर्वसामान्यांना दिलासा द्यायचं काम करायचं होतं.”
“तुमच्या हिताचेच निर्णय घेतले जातील. जयश्री जाधवही त्याच गोष्टींचा पाठपुरावा करतील. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचं नेतृत्व करतात. त्यांना पाठिंबा देणारा आमदार आपल्याला पाठवायचा आहे. म्हणून ही निवडणूक महत्त्वाची आहे,” असं अजित पवार म्हणाले.









