उत्तर प्रदेशात अखिलेश भाजपला टक्कर देतील, संजय राऊतांना विश्वास कायम
उत्तर प्रदेशासह पाच राज्यांच्या निवडणुकांचे कल येण्यास सुरुवात झाली आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष आणि उर्वरित चार राज्यांत भाजपला सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी मिळताना दिसत आहे. उत्तर प्रदेशात सुरुवातीच्या कलांमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपने बहुमताकडे वाटचाल केली आहे. शिवसेनेने उत्तर प्रदेशसह गोव्यातही उमेदवार उभे केले होते. परंतू या दोन्ही राज्यांत शिवसेनेला अद्याप कोणत्याही प्रकारे यश […]
ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशासह पाच राज्यांच्या निवडणुकांचे कल येण्यास सुरुवात झाली आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष आणि उर्वरित चार राज्यांत भाजपला सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी मिळताना दिसत आहे. उत्तर प्रदेशात सुरुवातीच्या कलांमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपने बहुमताकडे वाटचाल केली आहे. शिवसेनेने उत्तर प्रदेशसह गोव्यातही उमेदवार उभे केले होते. परंतू या दोन्ही राज्यांत शिवसेनेला अद्याप कोणत्याही प्रकारे यश मिळताना दिसत नाहीये.
असं असलं तरीही उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष योगी आदित्यनाथ यांना चांगली टक्कर देईल असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
Election Results 2022 Live Updates : पंजाबमध्ये ‘आप’ भांगडा! स्पष्ट बहुमताच्या दिशेनं
“अद्याप मतमोजणी सुरु आहे. पोस्टल मतांच्या कलावर जाऊ नका. दोन वाजेपर्यंत पूर्णपणे चित्र स्पष्ट होईल. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष पुढे आहे. उत्तराखंडमध्येही टक्कर सुरु आहे. गोव्यात अद्याप चित्र स्पष्ट होत नाहीये. उत्तर प्रदेशात भाजप आघाडीवर आहे. परंतू मला असंही वाटतंय की अखिलेश यादव भाजपला टक्कर देतील. पाठीमागून सुरुवात केल्यानंतरही अखिलेश यांनी उत्तर प्रदेशात चांगली कामगिरी केली आहे. गोवा आणि पंजाबसाठी आताच अनुमान लावणं ठीक होणार नाही”, असंही संजय राऊत म्हणाले.