आलिया भट्ट होणार आई; रुग्णालयातील फोटो शेअर करत चाहत्यांना दिली ‘गुड न्यूज’
काही महिन्यांपूर्वीच विवाहबद्ध झालेल्या बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी त्यांच्या चाहत्यांना गुड न्यूज दिलीये. आलिया भट्टने इन्स्टाग्रामवरून दोन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत आलियाने लवकरच तिच्या घरात पाळणा हलणार असल्याचं सांगितलंय. अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरने त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिलाय. आलिया […]
ADVERTISEMENT

काही महिन्यांपूर्वीच विवाहबद्ध झालेल्या बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी त्यांच्या चाहत्यांना गुड न्यूज दिलीये. आलिया भट्टने इन्स्टाग्रामवरून दोन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत आलियाने लवकरच तिच्या घरात पाळणा हलणार असल्याचं सांगितलंय.
अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरने त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिलाय. आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. यातील एक फोटो हॉस्पिटलमधील आहे. तर दुसरा फोटो सिंहाच्या जोडीचा आहे.
आलिया भट्ट रुग्णालयात असून, डॉक्टर सोनोग्राफी करत असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. कम्प्युटरच्या स्क्रीनवर आलियाने हार्टचा इमोजी लावला आहे. सोनोग्राफीवेळी आलियाच्या बाजूला एक व्यक्ती बसलेली दिसत आहे.
आलियासोबतची ती व्यक्तीही कम्प्युटरच्या स्क्रीनकडे बघत असून, तो रणबीर असावा असं फोटोतून दिसतंय. दुसऱ्या फोटोमध्ये सिंह, सिंहणी आणि त्यांचा बछडा दिसत आहे. आलिया भट्टने फोटो शेअर करताना म्हटलं आहे की, लवकरच आमचं बाळ येत आहे.