दलित असो की ब्राह्मण सर्व भारतीयांचा DNA एकच-देवेंद्र फडणवीस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अंदमानचे आदिवासी असोत, दक्षिणेतील नार असोत किंवा उत्तर प्रदेशातले दलित किंवा अगदी बंगालचे ब्राह्मण असोत सगळ्यांचा डीएनए एकच आहे. सगळ्या भारतीयांचा बाप एकच आहे. त्यामुळेच कुणीतरी आर्य, कुणी द्रविड आहे.. कुणी ब्राह्मण कुणी क्षत्रिय आहे हा सगळा वाद संपला आहे. असं अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केलं आहे.

ADVERTISEMENT

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“आम्ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत हे सांगण्यासाठी एक नवीन थेअरी इंग्रजांनी आणली. त्यांनी सांगितलं की मध्य युरोपातून आर्य संघर्ष करत या ठिकाणी आले. त्यावेळी द्रविड या भागात राहात होते. आर्य आणि द्रविड यांच्यात लढाई झाली. द्रविडांना दक्षिणेत टाकलं आणि आर्यांनी बसून मोहेंजदाडो आणि हडप्पा तयार केला म्हणजेच कुणी तर युरोपियांनी तयार केला हे सांगण्याचा प्रयत्न केला. तेच अनेक वर्ष आपण शिकत राहिलो.”

हे वाचलं का?

“मात्र याबाबत जेव्हा देशी आणि परदेशी इतिहासकारांनी संशोधन केलं तेव्हा कळलं की हे सगळं किती चुकीचं आहे ते आपल्यासमोर आणलं. प्रो. शिंदे किंवा अभिजित चावडा असतील यांनी यासंदर्भातलं सत्य समोर आणलं. जर संघर्ष झाला तर त्याचे पुरावे, खुणा असतात त्या दाखवा असा प्रश्न विचारला. ते म्हटल्याबरोबर डाव्या विचारसरणीचे विचारसणीचे इतिहासकार होते ते म्हणाले की हे असं नाही. त्यांनी युद्ध नाही केलं नाही तर ते फिरत आले, मग द्रविड बाजूला झाले. त्यावेळी कुठल्या मार्गाने आले ते सांगा हा प्रश्न विचारला गेला. आमच्या संशोधकांनी हे सांगितलं की भारतातली संस्कृती आणि सभ्यता जगातली सर्वात जुनी संस्कृती आणि सभ्यता आहे हे सांगितलं. तो विचार समोर मांडला. त्यासाठीच्या जुन्या गोष्टी, संदर्भ शोधून काढल्या. “

“अलिकडच्या काळात कार्बन डेटिंगपेक्षाही DNA टेस्टिंग हा महत्त्वाचा विषय आहे. या माध्यमातून नवीन थिअरी समोर आली आहे. ती असं सांगते की जगात जी काही मानवजात आहे त्यात सगळ्यात मोठा डिएनएचा हॅप्लो ग्रुप कुठला असेल तर तो R1A1A नावाचा आहे. याची सगळ्यात जास्त घनता ही भारतात पाहण्यास मिळते. त्याचा अभ्यास करून लोक युरोपात गेले ती सगळी तथ्य समोर आली आहेत. त्यामुळे आर्य आणि द्रविड हा वादही संपला. कारण याच माध्यमातून लक्षात आलं की भारतात राहणारे जेवढे आहेत. मग ते कोणत्याही जातीचे किंवा समाजाचे असोत. अंदमानचे आदिवासी, बंगालचे ब्राह्मण, दक्षिणतले नायर, उत्तर प्रदेशातले दलित या सगळ्यांचा डीएनए आहे. सगळ्यांचा बाप एकच. ब्राह्मण, क्षुद्र, दलित हे सगळं संपलं. इंग्रजांनी हे सगळं फायद्यासाठी वापरलं होतं ही थिअरी आपल्यासमोर मांडण्यात आली. ” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT