‘पठाण’चा वाद वाढला; हिंदूसह आता मुस्लिम संघटनाही शाहरुख खानच्या विरोधात वातावरण तापवणार
पठाण वाद : शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ चित्रपटाचा वाद वाढत चालला आहे. एकीकडे चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यावर हिंदू संघटना आपला राग काढत आहेत, तर मध्य प्रदेशात आता उलेमा बोर्डानेही या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली आहे. मध्य प्रदेश उलेमा बोर्डाने पठाण चित्रपटावर बहिष्कार टाकत तो प्रदर्शित न करण्याची मागणी केली आहे. मध्य […]
ADVERTISEMENT

पठाण वाद : शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ चित्रपटाचा वाद वाढत चालला आहे. एकीकडे चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यावर हिंदू संघटना आपला राग काढत आहेत, तर मध्य प्रदेशात आता उलेमा बोर्डानेही या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली आहे. मध्य प्रदेश उलेमा बोर्डाने पठाण चित्रपटावर बहिष्कार टाकत तो प्रदर्शित न करण्याची मागणी केली आहे.
मध्य प्रदेश उलेमा बोर्डाचे अध्यक्ष सय्यद अनस अली म्हणाले, पठाण नावाचा चित्रपट बनवला आहे, ज्यामध्ये शाहरुख खान हिरो आहे. लोक त्याला पाहतात, पसंत करतात. मात्र आम्हाला अनेक ठिकाणाहून फोन आणि तक्रारी आल्या असून या चित्रपटात अश्लीलता पसरवण्यात आली असून इस्लामचा चुकीचा प्रचार करण्यात आल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. ते पुढे म्हणाले, ऑल इंडिया मुस्लिम फेस्टिव्हल कमिटीने या चित्रपटाबाबत भूमिका घेतली असून चित्रपटावर बहिष्कार टाकला आहे. सरकारच्या लोकांना, जवानांनी हा चित्रपट पाहू नये, असे आवाहनही आम्ही करतो. हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ऑल इंडिया उलेमा बोर्डही याची शिफारस करून पाठीशी उभे आहे, असं ते म्हणाले.
पुढे बोलताना अनस अली म्हणाले, ‘जर कोणी आमचा इस्लाम, आमचा धर्म अशा प्रकारे मांडला तर आम्ही त्याबाबत तडजोड करणार नाही, हा आमचा हक्क आहे. जर कोणी इस्लामचे चुकीचे वर्णन करत असेल तर आपल्या धर्माचा योग्य मार्ग मांडणे ही आपली जबाबदारी आहे. सय्यद अनस अली पुढे म्हणाले, मी सेन्सॉर बोर्डाला जोरदार आवाहन करतो आणि भारतातील सर्व थिएटर मालकांना आणि लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही हा चित्रपट होऊ देऊ नका, कारण यामुळे चुकीचा संदेश जाईल, शांतता भंग होईल आणि सर्व लोक या देशातल्या मुस्लिमांच्या भावना दुखावल्या जातील आणि आमची चेष्टा केली जाईल. मी सर्वांना आवाहन करतो की, हा चित्रपट अजिबात पाहू नका, असं अनस अली म्हणाले.
मुस्लिमांची खिल्ली उडवण्यासाठी असे चित्रपट बनवले जातात : अनस अली
तो स्व:ताचा नाव शाहरूख सांगतो आणि शाहरुख खान म्हणत पठाण चित्रपट करतो. इस्लाम आणि मुस्लिमांची खिल्ली उडवण्यासाठी असे चित्रपट बनवले जातात, त्यांनाही विरोध व्हायला हवा. पठाण हा एक अतिशय आदरणीय बंधुवर्ग आहे, पण तो चित्रपटात अतिशय चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. मध्यप्रदेशच्या उलेमा बोर्डाचे अध्यक्ष सय्यद अनस अली यांनीही शाहरुख खानला आतापासून उमराहला जाण्यासाठी व्हिसा न देण्याची शिफारस हज समितीला केली आहे.
कोणत्या दिवशी रिलीज होणार पठाण?
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा पठाण हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी रिलीज होणार आहे. मात्र बेशरम रंग या चित्रपटाचे पहिले गाणे येताच चित्रपटावर गदारोळ सुरू झाला. हिंदू संघटनांपाठोपाठ आता मुस्लिम संघटनांनीही पठाण चित्रपटाला विरोध सुरू केला आहे. या चित्रपटाबाबत सोशल मीडियावरही बहिष्काराचा ट्रेंड सुरू आहे. आता या वादांचा चित्रपटाच्या कमाईवर कितपत परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.