मलिकांच्या आरोपानंतर जयदीप राणाचं नाव हटवलं; अमृता फडणवीस म्हणतात…
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी (1 नोव्हेबर) थेट माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्याचबरोबर जयदीप राणाने रिव्हर अँथम गाण्याला पैसा पुरवल्याचंही ते म्हणाले होते. त्यांच्या आरोपानंतर राणाचं नाव गाण्यातून हटवण्यात आलं. यासंदर्भात अमृता फडणवीस यांनी भूमिका मांडली. नवाब मलिक यांनी सोमवारी ट्विटरवर काही फोटो शेअर केले […]
ADVERTISEMENT
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी (1 नोव्हेबर) थेट माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्याचबरोबर जयदीप राणाने रिव्हर अँथम गाण्याला पैसा पुरवल्याचंही ते म्हणाले होते. त्यांच्या आरोपानंतर राणाचं नाव गाण्यातून हटवण्यात आलं. यासंदर्भात अमृता फडणवीस यांनी भूमिका मांडली.
ADVERTISEMENT
नवाब मलिक यांनी सोमवारी ट्विटरवर काही फोटो शेअर केले होते. यात जयदीप राणाचाही फोटो होता. जयदीप राणाला ड्रग्ज प्रकरणात अटक झालेली असून, त्यावरून मलिकांनी थेट फडणवीसांना ड्रग्ज पेडलरसोबत कनेक्शन असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई रिव्हर अँथम गाण्यातून जयदीप राणाचं नाव हटवण्यात आलं.
दरम्यान, नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांना अमृता फडणवीसांनी पत्रकार परिषदेतून उत्तर दिलं. यावेळी त्यांना जयदीप राणाचं नाव का हटवण्यात आलं अशी विचारणा करण्यात आली. त्यावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘रिव्हर मार्च संस्थेला तो ड्रग्जशी संबंधित आहे याची माहिती नसेल. आता म्हणून त्याचं नाव काढून टाकलं असेल. तीन चार वर्षांनी सेंट्रल एजन्सीने त्याला पकडलं. त्यांना वाटलं हे निगेटिव्ह कॅरेक्टर आहे, तर त्यांनी नाव काढलं यात चुकीचं काय आहे?’, असं उत्तर त्यांनी दिलं.
हे वाचलं का?
नवाब मलिक तुम्हाला जनता माफ करणार नाही! अमृता फडणवीस यांचा करारा जवाब
‘नवाब मलिक यांनी जाणीवपूर्वक आरोप केले आहेत. आमच्याकडे काहीच नाही; त्यामुळे काहीही एक्सपोज करु शकणार नाहीत. आमच्याकडे जमिनी नाही. साखर कारखाने नाहीत. त्यामुळे ते आरोप करणारच, पण आम्ही कुणाला घाबरत नाही. मी आणि देवेंद्र फडणवीस, आम्ही दोघांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही कारण नसताना मलिक यांच्याकडून चिखलफेक केली जात आहे’, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
ADVERTISEMENT
Drugs Case : दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार,
मलिकांचे पुरावे पवारांना देणार -देवेंद्र फडणवीस
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
‘ही संघटना नदी पुनरुज्जीवनासाठी काम करते. त्यावेळी आम्ही त्यांच्याशी जोडलो गेलो होतो. त्यावेळी हे फोटो काढलेले आहेत. सगळ्यांसोबत फोटो काढलेले आहेत. मलिक यांनी जाणीवपूर्वक माझ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला. यापाठीमागे त्यांची मानसिकता स्पष्टपणे दिसत आहे. यासंदर्भात रिव्हर मार्चवाल्यांनीच त्याच्याशी संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ते लोक रिव्हर मार्चवाल्यांसोबत आलेले होते. त्यांच्याशी आमचा दुरान्वयानेही संबंध नाही’, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT