Amruta Fadnavis : “राज्यपालांचं महाराष्ट्र प्रेम आत्तापर्यंत अनेकदा….”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यात अजूनही उमटतच आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातले आदर्श होते असं म्हटलं होतं. त्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही गुरूवारी पत्रकार परिषदेत राज्यपालांवर टीका केली. अशात आता अमृता फडणवीस यांनी मात्र राज्यपालांची पाठराखण केली आहे.

ADVERTISEMENT

काय म्हटलं आहे अमृता फडणवीस यांनी?

राज्यपालांना मी ओळखते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं मराठी भाषेवर खूप प्रेम आहे. ते एकमेव राज्यपाल असावेत जे इथे येऊन मराठी भाषा शिकले. ते खूपवेळा बोलतात त्याचे वेगळे अर्थ काढले जातात. भगतसिंह कोश्यारी हे मनापासून मराठी माणसावर ते प्रेम करणारे आहेत.

अमृता फडणवीस आज मुंबईत आल्या होत्या. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली. याशिवाय त्या दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावरही स्पष्टपणे बोलल्या. श्रद्धाचं जे झालं ते खूपच वाईट आहे ऐकूनही मन सुन्न होतं. आता या प्रकरणाच्या खोलापर्यंत गेलं पाहिजे आणि त्या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे असंही अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

श्रद्धा वालकर हत्याकांडावरही भाष्य

दिल्लीतील श्रद्धा हत्याकांड प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, अमृता फडणवीसांनी संताप व्यक्त केला. श्रद्धाबाबत झाले त्याबाबत दुःख होतंय. खोलात जावून तिला न्याय मिळाला पाहिजे. असा न्याय मिळाला पाहिजे की सगळे हादरले पाहिजेत. स्त्रीयांवर हात उचलायची, कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देणे गरजेचे आहे, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातले आदर्श होते. नव्या काळातले आदर्श बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत अनेक आहेत हे वक्तव्य केलं. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.

ADVERTISEMENT

शरद पवारांनी काय म्हटलं आहे राज्यपालांविषयी?

माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा काय तो निकाल लावावा, अशा व्यक्तीला अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या देण योग्य नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यपालांना हटविण्याची मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर मागील काही दिवसांपासून राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात महाराष्ट्रभरात आंदोलन आणि निदर्शन केली जात असून त्यांना हटविण्याची मागणी होत आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT