आधी मोबाईल काढून घेतले, मग समर्थन पत्रावर सही घेतली, बिहारच्या महाआघाडी सरकारची रंजक कहाणी
बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे, परंतु हे सरकार स्थापनेपूर्वी राजदला कोणताही धोका पत्करायचा नव्हता, म्हणून महागठबंधनमधील सर्व आमदारांना ९ ऑगस्टला सकाळी राबरी निवासस्थानी बोलावले होते. बैठक कशासाठी आहे हे सांगण्यात आले नव्हते. सर्वांना ७ ऑगस्टलाच राबरी निवासस्थानी येण्यास सांगितले होते. आरजेडीचे आमदार इस्रायल मन्सूरी यांनी सांगितल्यानुसार, आमदार राबरी निवासस्थानी पोहोचले तेव्हा सर्वांना आपल्या गाडीतच […]
ADVERTISEMENT

बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे, परंतु हे सरकार स्थापनेपूर्वी राजदला कोणताही धोका पत्करायचा नव्हता, म्हणून महागठबंधनमधील सर्व आमदारांना ९ ऑगस्टला सकाळी राबरी निवासस्थानी बोलावले होते. बैठक कशासाठी आहे हे सांगण्यात आले नव्हते. सर्वांना ७ ऑगस्टलाच राबरी निवासस्थानी येण्यास सांगितले होते.
आरजेडीचे आमदार इस्रायल मन्सूरी यांनी सांगितल्यानुसार, आमदार राबरी निवासस्थानी पोहोचले तेव्हा सर्वांना आपल्या गाडीतच मोबाइल फोन ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यानंतर ते आतमध्ये पोहोचले असता त्यांची पाठिंब्याच्या पत्रावर प्रथम सही घेण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट रोजी सर्व आमदार सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत राबरी निवासस्थानी होते. या बैठकीला केवळ राजदच नाही तर काँग्रेस आणि इतर महाआघाडीचे आमदारही उपस्थित होते. चार वाजता राज्यपाल फागू चौहान यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर नितीश कुमार राबडी देवींच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा तेजस्वी यांच्यासह सर्व आमदार तेथे उपस्थित होते.
२०२५ मध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री होणार नाहीत- राम सुरत राय
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या वक्तव्यावर भाजप आमदार आणि माजी मंत्री राम सुरत राय यांनी प्रत्युत्तर दिले. 2024 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील पण 2025 मध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. त्यांनी आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी ते नवव्यांदा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत असे राम सुरत राय म्हणाले आहेत.