Andheri Bypoll : नववी पास मुरजी पटेल कोट्याधीश, क्लर्क राहिलेल्या ऋतुजा लटके लखपती
मुंबई :अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी अधिकृतपणे सुरु झाली आहे. भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे दोन पक्ष या निमित्ताने आमने-सामने आले आहेत. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष युतीचे उमेदवार मुरजी पटेल तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार म्हणून ऋतुजा लटके यांनी अर्ज दाखल केला आहे. काल (शुक्रवारी) अर्ज भरल्यानंतर आज दोन्ही बाजूंनी […]
ADVERTISEMENT
मुंबई :अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी अधिकृतपणे सुरु झाली आहे. भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे दोन पक्ष या निमित्ताने आमने-सामने आले आहेत. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष युतीचे उमेदवार मुरजी पटेल तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार म्हणून ऋतुजा लटके यांनी अर्ज दाखल केला आहे. काल (शुक्रवारी) अर्ज भरल्यानंतर आज दोन्ही बाजूंनी प्रचाराला सुरुवात झाली आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल करतेवेळी निवडणूक आयोगापुढे आपल्या संपत्तीचं विवरण सादर केलं आहे. यानुसार भाजपचे उमेदवार मुरजी पटेल हे कोट्याधीश आहेत. तर ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या लखपती आहेत. दिवंगत रमेश लटके यांची संपत्ती अद्याप ऋतुजा लटके यांच्या नावावर झालेली नाही. त्याबाबतची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
मुरजी पटेल आहेत कोट्याधीश :
निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, मुरजी पटेल नववी पास आहेत. मुरजी पटेल आणि कुटुंबियांच्या नावावर एकूण संपत्ती १० कोटी ४१ लाख रुपये आहे. यात स्वतः मुरजी पटेल यांच्या नावावर ५ कोटी ४१ लाख ७१ हजार रुपयांची एकूण संपत्ती आहे. तर पत्नी, अपत्यांच्या नावावर ५ कोटींची संपत्ती आहे. तर मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर २ कोटी रुपयांचं कर्ज आहे.
हे वाचलं का?
मुरजी पटेल यांच्या नावावर १ लाख ५० हजारांचे शेअर्स, तर एक इनोव्हा गाडी आहे. याशिवाय मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर अंधेरीमध्ये तीन फ्लॅट आहेत. मुरजी पटेल यांच्या नावावर सोनं नाही. तर त्यांच्या पत्नीकडे ५० ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. याशिवाय दोघांच्या नावावर मिळून गुजरातमधील कच्छ येथे ६० एकर जमीन आहे. याची सध्याची किंमत ४ कोटी २५ लाख रुपये इतकी आहे.
ऋतुजा लटके आहेत लखपती :
ऋतुजा लटके यांनी निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानासुर ऋतुजा लटके यांनी कॉमर्समधून पदवीचं शिक्षण घेतलं आहे. त्यांच्याकडे ४३ लाख ८९ हजार ५०४ रुपयांची जंगम आणि ५१ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर त्यांच्या नावावर १५ लाख रुपयांचं कर्ज आहे.
ADVERTISEMENT
ऋतुजा लटके यांच्याकडे ७५ हजारांची तर त्यांच्या मुलाकडे ५ हजारांची रोख रक्कम आहे. तर ३ लाख रुपयांचे बँक डिपॉझिट आहेत. तर ५ लाख ९८ हजार रुपयांचे शेअर्स त्यांच्या नावावर आहेत. १० लाख ११ हजार रुपयांचे पोस्टल डिपॉझिट आणि विमाही लटके यांच्या नावावर आहे. लटके यांच्याकडे ११ लाख ४८ हजार रुपये किंमतीचे दागिने आहेत.
ADVERTISEMENT
लटके यांच्यासह मुलांच्या नावावर १२.३५ एकर जमीन आहे. तर त्यांच्या नावे चिपळूणमध्ये एक घर आहे. दिवंगत पती रमेश लटके यांची मालमत्ता अद्याप त्यांच्या नावावर झालेली नाही. ती प्रक्रिया सुरू असल्याचही त्यांनी प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT