‘राज ठाकरे मुर्दाबाद’ मुरजी पटेलांना अर्ज मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते भडकले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या निवडणुकीबद्दलची अंतिम भूमिका भाजपनं आज स्पष्ट केली. सुरुवातीला विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटलेल्या भाजपनं ऐनवेळी मुरजी पटेलांना माघार घ्यायला लावली. त्यामुळे निवडणूक जिंकण्याचा दावा करणाऱ्या मुरजी पटेलांची निराशा झालीये. पण निवडणुकीत माघार घेतल्यानंतर मुरजी पटेल समर्थक भाजपच्या कार्यकर्त्यांचा संताप झाल्याचं बघायला मिळालं.

ADVERTISEMENT

अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं शिंदे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष बघायला मिळू शकतो, असं म्हटलं जात होतं. मात्र, निवडणुकीपूर्वीच या राजकीय संघर्षाला पूर्णविराम मिळालाय. भाजपनं अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेतलीये. त्यामुळे मोठ्या तयारीने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या मुरजी पटेलांची निराशा झालीये. तर दुसरीकडे मुरजी पटेल समर्थक भाजप कार्यकर्त्यांमधूनही तीव्र संताप व्यक्त झालाय.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोटनिवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली. त्यानंतर मुरजी पटेलांनी अर्ज मागे घेतला. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर मुरजी पटेल समर्थक भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या भूमिकेवर टीका केलीये. मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर तिथे जमलेले कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी घोषणाबाजीही केली.

हे वाचलं का?

ऋतुजा लटकेंच्या विजयाचा मार्ग मोकळा! भाजपची अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार

महत्त्वाचं म्हणजे या कार्यकर्त्यांनी मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. संतप्त झालेल्या मुरजी पटेल समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. कार्यकर्त्यांचा गोंधळ आणि घोषणाबाजी वाढल्यानंतर पोलिसांनी संतप्त कार्यकर्त्यांना पांगवलं.

ADVERTISEMENT

राज ठाकरेंविरुद्ध भाजप कार्यकर्त्यांनी का दिल्या घोषणा?

अंधेरी पूर्व निवडणुकीसाठी भाजपनं मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली होती. त्याचबरोबर प्रचारही सुरू केला होता. ऋतुजा लटके विरुद्ध मुरजी पटेल अशी लढत होणार असं चित्र असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ऋतुजा लटके यांना पाठिंबा दिला. इतकंच नव्हे तर त्यांनी भाजपनं निवडणूक लढू नये, असं आवाहनही केलं आणि तिथूनच मुरजी पटेलांच्या निवडणूक रिंगणात बाहेर पडण्यास सुरूवात झाली. त्यामुळे राज ठाकरेंविरोधात आणि भाजपविरोधातच मुरजी पटेलांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT