अनिल देशमुखांच्या पदरी पुन्हा निराशा, कोर्टाने CBIची मागणी केली मान्य!

विद्या

Anil Deshmukh Bail: मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या जामिनावरील (Bail) स्थगिती हायकोर्टाने (High Court) वाढवली आहे. त्यामुळे अनिल देशमुखांचा तुरुंगातील मुक्काम देखील वाढल आहे. हायकोर्टाने सीबीआय (CBI) प्रकरणात अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करतानाच 10 दिवसांची स्थगिती देखील दिली होती. जी आज 27 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. (corona wreaks havoc in china […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Anil Deshmukh Bail: मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या जामिनावरील (Bail) स्थगिती हायकोर्टाने (High Court) वाढवली आहे. त्यामुळे अनिल देशमुखांचा तुरुंगातील मुक्काम देखील वाढल आहे. हायकोर्टाने सीबीआय (CBI) प्रकरणात अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करतानाच 10 दिवसांची स्थगिती देखील दिली होती. जी आज 27 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. (corona wreaks havoc in china waiting for funeral too)

कोर्टाचा हा निर्णय अनिल देशमुख यांच्यासाठी मोठा धक्काच म्हणावा लागेल. कारण सीबीआयची मागणी हायकोर्टाने मान्य केली आहे. त्यामुळे या जामिनाला दिलेली स्थगिती ही 27 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

सीबीआयने उच्च न्यायालयात धाव घेत तातडीने विनंती केली होती की, सर्वोच्च न्यायालय हे नाताळच्या सुट्टीनिमित्त जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बंद आहे त्यामुळे त्यांनी देशमुखांच्या जामिनाला जे आव्हान दिलं आहे त्यामुळे सुनावणी होऊ शकत नाही. याच कारणास्तव जामिनावरील स्थगिती वाढवून देण्यात यावी अशी मागणी सीबीआयने हायकोर्टात केली होती. सीबीआयच्या वतीने ए. एसजी. अनिल सिंह यांनी युक्तीवाद केला.

Anil Deshmukh Case Chronology: अँटेलिया, वाझे अन् 100 कोटी, कसे अडकलेले अनिल देशमुख?

हे वाचलं का?

    follow whatsapp