सचिन वाझे भाजपला खटकतात, अनिल परब यांनी सांगितलं कारण
सचिन वाझे भाजपला खटकतात कारण त्यांनी अर्णब गोस्वामीवर कारवाई केली होती. त्यामुळे सचिन वाझेंवर भाजपचा राग आहे. विधानसभेच्या अधिवेशनात ते सचिन वाझेंवरचा राग काढत आहेत असं वक्तव्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे. ‘फडणवीस अडचणीत येतील म्हणून ते सचिन वाझेला टार्गेट करतायेत’ मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचं प्रकरण आणि मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं […]
ADVERTISEMENT

सचिन वाझे भाजपला खटकतात कारण त्यांनी अर्णब गोस्वामीवर कारवाई केली होती. त्यामुळे सचिन वाझेंवर भाजपचा राग आहे. विधानसभेच्या अधिवेशनात ते सचिन वाझेंवरचा राग काढत आहेत असं वक्तव्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे.
‘फडणवीस अडचणीत येतील म्हणून ते सचिन वाझेला टार्गेट करतायेत’
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचं प्रकरण आणि मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं प्रकरण या दोन्हीचा तपास सुरू आहे. या चौकशीमध्ये जे कुणी दोषी असतील त्यांना महाविकास आघाडी सरकार माफ करणार नाही. सचिन वाझे हे जरी दोषी आढळले तर त्यांना पाठिशी घालणार नाही. सचिन वाझे हे पुरावे नष्ट करू शकतात हा विरोधी पक्षाचा दावा हास्यास्पद आहे असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जे काही पुरावे आहेत ते त्यांनी एटीएसकडे, पोलिसांकडे द्यावेत त्यामुळे तपास सोपा होईल, दोषींना शिक्षा होईल असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे. मात्र ते कोणतेही पुरावे द्यायला तयार नाहीत असंही परब यांनी स्पष्ट केलं.