राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचं गणित; विरोधकांकडे जास्त मतं?, मोदींना धक्का बसणार?
नवी दिल्ली: भारताला २१ जुलै रोजी नवा राष्ट्रपती मिळणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ येत्या २४ जुलै रोजी संपत आहे, त्यामुळे देशात १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणुक होत आहेत. निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीचा संपुर्ण कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीच्या हालचाली देशात सुरु झाल्या आहेत. आज विरोधी पक्षांची दिल्लीमध्ये बैठक पार पडत आहे. यावेळी […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: भारताला २१ जुलै रोजी नवा राष्ट्रपती मिळणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ येत्या २४ जुलै रोजी संपत आहे, त्यामुळे देशात १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणुक होत आहेत. निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीचा संपुर्ण कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीच्या हालचाली देशात सुरु झाल्या आहेत. आज विरोधी पक्षांची दिल्लीमध्ये बैठक पार पडत आहे. यावेळी युपीएचा उमेदवार कोण हे जाहीर होण्याची शक्यता आहे. मोदी सरकारच्या विरोधात एक मजबूत उमेदवार विरोधी पक्ष देण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी चर्चेत आहे.
शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या बैठकीत आपली राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याची इच्छा नाही हे सांगितले होते. तरीही देशातील बडे नेते शरद पवारांनीच ही निवडणूक लढवावी अशी मागणी आजच्या बैठकीत करण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांनी पुढाकार घेऊन बिगर भाजपशासीत राज्यातील पक्षांना आज दिल्लीत एकत्र केले आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढण्यासाठी लागणारी पुरेशी मतदारांची संख्या विरोधाकांकडे नाहीये. तरीही विरोधक निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. नेमकं या निवडणुकीचं गणित कसं आहे ते जाणून घेऊया.
राज्यसभेतील किती खासदार मतदान करणार?
संसदेतील वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेमध्ये एकून २४५ सदस्य असतात. त्यापैकी २३३ सदस्यच मतदान करु शकतात. जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेण्यात आलेला आहे. केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळालेल्या काश्मीरच्या कोट्यातील चार खासदारांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे यंदाच्या राज्यसभा निवडणुकीत २२९ सदस्यच मतदान करणार आहेत.
लोकसभेतील किती सदस्य मतदान करणार?
लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. लोकसभेमध्ये ५४३ सदस्य आहेत. ते सर्वच्या सर्व मतदान करणार आहेत. ज्याठिकाणी लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे, तिथलेही खासदार मतदान करु शकतील. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत फक्त राज्यातील विधानसभेतील आमदाराच मतदान करु शकतात. विधान परिषदेतील आमदार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करत नाही. देशातील सर्व विधानसभा आमदारांची संख्या ४ हजार ३३ आहे, त्यामुळे एकून मतदारांची संख्या ३ हजार ८०९ एकढी आहे.