Jammu and Kashmir: दहशतवादी मसूद अझहरचा पुतण्या कमांडर लंबू चकमकीत ठार, लष्कराचं मोठं यश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये शनिवारी लष्कर आणि पोलीस कर्मचाऱ्यांना मोठे यश मिळाले. दक्षिण काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या दहशतवाद्यांपैकी एक जैश-ए-मुहम्मदचा प्रमुख मसूद अजहरचा पुतण्या आहे. ज्याचे नाव इस्माईल उर्फ ​​लंबू आहे. तो एक आयईडी तज्ज्ञ होता. तसंच लथपोरा पुलवामा हल्ल्याच्या कटात देखील त्याचा सहभाग होता.

या हल्ल्यामुळेच एनआयएच्या आरोपपत्रात देखील त्याचे नाव होते. याशिवाय काश्मिरात घडवून आणलेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्येही त्याचा सक्रीय सहभाग होता. त्यामुळेच इस्माईलला कंठस्नान घातल्याने लष्कराच्या हाती मोठं यश लागलं आहे.

मोहम्मद इस्माईल उर्फ ​​फौजी भाई सध्या काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदचा मुख्य कमांडर होता. तो मसूद अझहरचा पुतण्या देखील होता. इस्माईल हा बहावलपूरच्या कोसर कॉलनीत राहत होता. तो 2020 आणि 2019 च्या पुलवामा हल्ल्यात सामील होता आणि तेव्हापासूनच सुरक्षा दलाची त्याच्यावर नजर होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

2019 साली झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे तब्बल 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यात आयईडीचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता. ज्यामध्ये इस्माईलचा मोठा हात होता.

गुप्तचर संस्थेच्या डोजियरच्या मते, अबू सैफुल्लाचा जन्म पाकिस्तानात झाला होता आणि तो दहशतवादी संघटनांच्या देखरेखीखाली मोठा झाला होता. 2017 मध्ये त्याने भारतात घुसखोरी केली होती. त्यामुळे तो अवंतीपोरा, पुलवामा, अनंतनाग येथे दहशतवादी कारवाया करायचा.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT