मनी माफिया वेबसीरिज प्रकरणात डिस्कव्हरी प्लसला अरूण गवळींनी का पाठवली नोटीस?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मनी माफिया या मालिकेत बदनामी प्रकरणा अॅमेझॉन, व्हॉईस मीडिया आणि डिस्कव्हरी प्लस या सगळ्यांना अरूण गवळींनी नोटीस पाठवली आहे.या मालिकेत माझा उल्लेख करताना परवानगी घेतली नसल्याचा दावा केला आहे. डिस्कव्हरी प्लस, अॅमेझॉन आणि व्हॉईस मीडिया या सगळ्यांनी बिनशर्त माफी मागावी आणि अरूण गवळी यांचा उल्लेख काढून टाकावा अशी मागणीही नोटीसद्वारे करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

काय आहे प्रकरण?

मनी माफिया ही मालिका ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वी ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आली आहे. याच वेब सीरिज प्रकरणात अरूण गवळींकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. अरूण गवळींच्या वकिलांनी डिस्कव्हरी प्लसला ही नोटीस पाठवली आहे. वेब सीरिजच्या माध्यमातून माझी बदनामी करण्यात आल्याचं अरूण गवळींनी म्हटलं आहे. तसा उल्लेखही या नोटीसमध्ये करण्यात आला आहे.

अरूण गवळींच्या वकिलांनी काय म्हटलं आहे?

अरूण गवळींच्या वकिलांनी हे म्हटलं आहे की मागच्या १३ वर्षांपासून अरूण गवळी हे नागपूरच्या तुरुंगात आहेत. त्यांच्या विरोधात कुठलाही गुन्हा नोंद नाही. तसंच कुणीही तक्रारही दाखल केलेली नाही. मात्र वेब सीरिजमध्ये त्यांचं चारित्र्य हनन करण्यात आलं आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर बदनामी केली. अशा प्रकारे वेब सीरिजमधून बदनामी कऱणं गैर आहे त्यामुळे आम्ही नोटीस पाठवली आहे असं अरूण गवळींच्या वकिलांनी सांगितलं.

हे वाचलं का?

अरुण गवळींच्या मुलाचे १७ नोव्हेंबरला मुंबईत लग्न आहे. त्या पार्श्वभूमीवर रजेची मागणी गवळी यांनी केली होती. त्यानुसार गवळी यांना ४ दिवसांची रजा मंजूर करण्यात आली. या रजेत पोलीस सुरक्षेसह गवळी यांनी मुंबईला जावे, अशी अट कारागृह प्रशासनाच्या वतीने घालण्यात आली होती. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर खून प्रकरणी गवळी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

मनी माफिया ही मालिका काही दिवसांपूर्वी ओटीटीवर प्रदर्शीत करण्यात आली आहे. मुलाच्या लग्नासाठी अरुण गवळी पॅरोलवर तुरूंगाबाहेर आले होते. त्यानंतर मनी माफियाबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वकिलामार्फत अमेझॉन, व्हॉईस मीडिया आणि डिस्कव्हरीला कायदेशीर नोटीस पाठवली. अरूण गवळी यांच्यावतीने वकील आशिष पाटणकर आणि प्रतीक राजोपाध्ये यांनी संबंधीत नोटीस बजावली आहे. अरूण गवळी यांना पैसे दिल्याशिवाय भायखळ्यात इमारत बांधू शकतो का? त्याचा विचारही करता येणार नाही? मालिकेतील अशा संवादांवरही या नोटीसद्वारे आक्षेप व्यक्त करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT