अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान; दिल्लीतील सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन लोट्स…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दिल्लीतील मद्य उत्पादन धोरण घोटाळ्याचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसा आम आदमी पार्टी आणि भाजपमधील संघर्ष वाढत चालला आहे. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपचे ऑपरेशन लोट्स दिल्लीत अयशस्वी झाल्याचा दावा केला आहे. दिल्लीत भाजपचा सरकार पाडण्याचा कट होता, असे स्पष्टपणे केजरीवाल यांनी सांगितले आहे.

ADVERTISEMENT

सरकार पाडण्यासाठी धाडी टाकण्यात आल्या : केजरीवाल

अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून लिहिले की, दिल्लीत ऑपरेशन लोटस अयशस्वी झाले आहे. सीबीआय आणि ईडीच्या धाडीच मद्य उत्पादन धोरण याचा आणि भ्रष्टाचाराशी काही संबंध नाही? दिल्लीतील ‘आप’ सरकार पाडण्यासाठीच हे छापे पडले? जसे त्यांनी इतर राज्यात केले आहे तसं दिल्लीत ते करू पाहत होते, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

हे वाचलं का?

मनिष सिसोदियांचा दावा

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे. कारण सोमवारी मनिष सिसोदिया यांनी सर्वात आधी मोठा आरोप केला होता. त्यांना भाजपकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. पक्ष फोडल्यास त्यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले जातील, असेही सांगण्यात आल्याचं सिसोदियांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

मनिष सिसोदियांकडे आहे भाजप नेत्याची कॉल रेकॉर्डिंग

ADVERTISEMENT

नंतर मनीष सिसोदिया यांनी दावा केला होता की त्यांच्याकडे भाजप नेत्याची रेकॉर्डिंग आहे. या भाजप नेत्याने त्यांना ऑफर दिली होती. वेळ आल्यावर. आपण रेकॉर्डिंग प्रसिद्ध करणार असल्याचा इशाराही देण्यात आला. मात्र या आरोपावरून भाजप नेते मनोज तिवारी यांनी त्यांचा फोन सीबीआयकडे असताना, त्यांना कोणत्या फोनवर मेसेज आला, असा सवाल उपस्थित केला.

मद्य धोरणावर केजरीवालांचे स्पष्टीकरण

अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया आज गुजरात दौऱ्यावर आहेत. गुजरातच्या मातीतूनच भाजपवर सातत्याने हल्ले होत आहेत. मद्य धोरण घोटाळ्याचीही चर्चा होत असून भाजपच्या भ्रष्टाचारावरही जोर धरला जात आहे. जनतेशी संवाद साधताना केजरीवाल यांनी गुजरातमध्ये दारूबंदीचे धोरण कायम ठेवू, पण अवैध दारू व्यवसाय करणार नाही, असे म्हटले आहे. दिल्लीत 850 दारूची दुकाने उघडायची होती परंतु 500 दुकानेही उघडू शकलो नाहीत. कारण केंद्राच्या दबावामुळे अधिकाऱ्यांनी लिलाव करण्यास नकार दिला. आमच्याकडे पर्याय नव्हता. म्हणूनच आम्ही जुन्या धोरणावर गेलो. जुन्या धोरणात 100 त्रुटी आहेत, मात्र गुजरातप्रमाणे तेथे बनावट दारू विकली जात नाही, असं केजरीवाल म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT