आर्यनवर ड्रग्ज सेवन केल्याचा गुन्हा, पण NCB ने मेडीकल टेस्ट केलीच नाही – वकीलांची कोर्टात माहिती

मुंबई तक

ड्रग्ज पार्टी प्रकरणात NCB तर्फे अटकेची कारवाई करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनबद्दल आता महत्वाची माहिती समोर येते आहे. आर्यन खानला न्यायालयानी कोठडी सुनावण्यात आल्यामुळे तो सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. NCB ने आर्यन खानवर अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असला, तरीही त्याची मेडीकल टेस्ट NCB ने केली नाही. ड्रग्ज पार्टीत पकडलेल्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

ड्रग्ज पार्टी प्रकरणात NCB तर्फे अटकेची कारवाई करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनबद्दल आता महत्वाची माहिती समोर येते आहे. आर्यन खानला न्यायालयानी कोठडी सुनावण्यात आल्यामुळे तो सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. NCB ने आर्यन खानवर अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असला, तरीही त्याची मेडीकल टेस्ट NCB ने केली नाही.

ड्रग्ज पार्टीत पकडलेल्या आरोपींचं नियमानुसार रक्त आणि लघवी तपासली जाते. परंतू NCB ने आर्यन खानची मेडीकल टेस्ट केलीच नसल्याची माहिती त्याचे वकील सतीश मानेशिंदे यांनी कोर्टात दिली.

इतकच नव्हे तर आर्यनने स्वतःहून NCB अधिकाऱ्यांना आपली मेडीकल चाचणी घेण्याची तयारी दाखवली होती, परंतू NCB ने त्याची चाचणी केलीच नसल्याचं मानेशिंदेंनी सांगितलं. आर्यन खान, अरबाज मर्चंट यांच्यासह काही आरोपींना NCB ने २ ऑक्टोबरच्या रात्री ताब्यात घेऊन अटक केली होती. NCB ने दिलेल्या माहितीनुसार, Cordelia या अलिशान क्रुझवर या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. बहुतांश वेळा अशा प्रकारच्या रेव्ह पार्टी या समुद्रकिनारी आयोजित केल्या जातात. परंतू ही रेव्ह पार्टी दोन ऑक्टोबरला क्रुझवर आयोजित करण्यात आली होती.

‘NCB ने राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या मुलाशी चांगले संबंध असलेल्या व्यक्तीला सोडून दिलं’

हे वाचलं का?

    follow whatsapp