Jayant Patil : “मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी महाराष्ट्राला दीर्घकाळ लक्षात राहतील”
राज्यात झालेल्या राजकीय भूकंपानंतर सात दिवसांनी अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राजीनामा दिला आहे. विधान परिषदेचं सदस्यत्व आणि मुख्यमंत्रीपद ही दोन्ही पदं उद्धव ठाकरे यांनी सोडली आहेत. राज्यपालांना भेटून त्यांनी आपल्या दोन्ही पदांचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे महाराष्ट्राला […]
ADVERTISEMENT

राज्यात झालेल्या राजकीय भूकंपानंतर सात दिवसांनी अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राजीनामा दिला आहे. विधान परिषदेचं सदस्यत्व आणि मुख्यमंत्रीपद ही दोन्ही पदं उद्धव ठाकरे यांनी सोडली आहेत. राज्यपालांना भेटून त्यांनी आपल्या दोन्ही पदांचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे महाराष्ट्राला दीर्घकाळ लक्षात राहतील असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले आहेत जयंत पाटील?
महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीचा अद्भूत प्रयोग शरद पवार यांनी केला. महाराष्ट्राच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष त्यांनी एकत्र आणले. गेल्या अडीच वर्षापासून शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना या सरकारने आणल्या. लोकपयोगी कामं केली. आज महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांशी संवाद साधून राजीनामा दिला. महाराष्ट्राला एक सरळ, चांगला आणि लोकांच्या सेवेसाठी वाहिलेला मुख्यमंत्री मिळाला होता. त्यांचं शेवटचं भाषण मुख्यमंत्री म्हणून केलं असलं तरी त्यांनी सगळ्यांचे आभार मानले.
उद्धव ठाकरे यांनी सोबत काम करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचं सरकार होतं. भाजपची संख्या जास्त होती. मात्र तीन पक्षांची बेरीज एकत्र आली. मात्र दुर्दैवाने शिवसेनेचे आमदार शिवसेनेपासून दुरावले. ते जरी म्हणत असले की आम्ही शिवसेनेत आहोत तरीही त्यांचा पाठिंबा नाही हे कळल्यावर उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं एक चांगलं सरकार, स्वच्छ कारभार करणारं सरकार गेलं आहे. कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरेंनी उत्तम काम केलं. त्यांनी एक वेगळा आदर्श ठेवला. अनेक चांगल्या कामांमध्ये लोकांना प्रोत्साहन देऊन काम करून घेतलं. मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र उद्धव ठाकरेंना दीर्घकाळ लक्षात ठेवेल असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.









