Asha Mamidi : ‘…तर आम्ही सुषमा अंधारेंना चोप देऊ’; शिंदे गटाच्या नेत्या म्हणाल्या, ‘अंधारे माकडीण’
शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे सातत्यानं बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट), एकनाथ शिंदे आणि आमदारांना डिवचताना दिसत आहे. सुषमा अंधारे यांच्याकडून होत असलेल्या टीकेला आता काही आठवड्यांपूर्वी उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्या आणि शिंदे गटाच्या उपनेत्या आशा मामिडी यांनी प्रत्युत्तर दिलंय. ‘मुंबई Tak’ला दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या नेत्या आशा मामिडी यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या […]
ADVERTISEMENT

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे सातत्यानं बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट), एकनाथ शिंदे आणि आमदारांना डिवचताना दिसत आहे. सुषमा अंधारे यांच्याकडून होत असलेल्या टीकेला आता काही आठवड्यांपूर्वी उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्या आणि शिंदे गटाच्या उपनेत्या आशा मामिडी यांनी प्रत्युत्तर दिलंय.
‘मुंबई Tak’ला दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या नेत्या आशा मामिडी यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना प्राण्यांच्या उपमा देत टीका केलीये. सुषमा अंधारे या वाघीण नाही, तर माकडीण आहेत, अशा शब्दात आशा मामिडी यांनी खोचक टीका केलीये.
आशा मामिडी म्हणाल्या, ‘सुषमा अंधारेंनी आरशात बघावं आणि दुसऱ्यांना माकड म्हणावं. पक्षात त्यांचं योगदान काय आहे? प्रसिद्धीसाठी त्या कुणावरही काहीही बोलत आहेत. अंधारे या फक्त टीका करत आहेत. सुषमा अंधारे सुपारी घेऊन काम करत आहेत’, अशा शब्दात आशा मामिडींनी सुषमा अंधारेंवर टीकास्त्र डागलंय.
शिवसेनेत प्रवेश करताच उद्धव ठाकरेंकडून ‘प्रमोशन’; कोण आहेत सुषमा अंधारे?