Atiq Ahmed : अतिकने जागेवरच सोडला जीव, कारण… पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये झाला खुलासा

मुंबई तक

ADVERTISEMENT

atiq ahmed postmortem report 8 bullets in body 18 round fire
atiq ahmed postmortem report 8 bullets in body 18 round fire
social share
google news

Atiq Ahmad Postmortem Report : कुख्यात गुंड आणि माजी खासदार अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद (Ashraf Ahmad)यांची शनिवारी पोलिसांसमोरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर देशात एकच खळबळ माजलीय.योगी आदित्यनाथ सरकारवर विरोधक टीका करतायत. या प्रकरणी आता उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकारने तीन सदस्यीय न्यायिक आयोगाची नियुक्ती केली आहे. दरम्यान आता या घटनेत अतिकचे पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आले आहे. या रिपोर्टमध्ये अतिकच्या शरीरात कोणत्या-कोणत्या ठिकाणी गोळी लागली आहे, याची माहिती समोर आली आहे. (atiq ahmed postmortem report 8 bullets in body 18 round fire)

ADVERTISEMENT

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय?

प्रयागराजमध्ये अतिक अहमदवर (Atiq Ahmed) एकूण 8 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे या गोळ्या शरीरातील त्या ठिकाणी मारण्यात आल्या होत्या, ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा लगेच मृत्यू होतो. अतिक अहमदला एक गोळी डोक्यात, दुसरी गोळी छातीत, तर इतर गोळ्या मान, पोट आणि कमरेत मारल्या गेल्या होत्या, अशी माहिती पोस्टमार्टममधून समोर आली आहे. या पोस्टमार्टमनंतर दोघांचे मृतदेह कब्रस्तानमध्ये पाठवण्यात आले होते.

प्रकरण काय?

अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि अश्रफ अहमदला (Ashraf Ahmad) पोलिसांचे पथक शनिवारी रात्री 10 वाजता मेडिकलसाठी हॉस्पिटलला नेत होते. या दरम्यानच पत्रकार बनून आलेल्या तीन हल्लेखोरांनी पोलिसांसमोरच 40 सेकंदात 18 राऊंड फायरींग करून दोघांची हत्या केली. या हल्ल्यात अतिकला 8 गोळ्या लागल्याची माहिती आहे. यामध्ये 1 गोळी त्याच्या डोक्यात, दुसरी मानेवर, तिसरी छातीत, चौथी पोटात आणि कमरेत पाचवी मारल्याची माहिती आहे.

हे वाचलं का?

अतिक (Atiq Ahmed) आणि अश्रफ यांच्या हत्येनंतर तिन्ही आरोपींनी सरेंडर केले होते.त्यामुळे तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. यामधील आरोपी लवलेश तिवारी हा बांदा येथील रहिवासी आहे. अरुण मौर्य हा कासगंजचा, तर तिसरा आरोपी सनी हा हमीरपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे.या प्रकरणात आता उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणात तीन सदस्यीय न्यायिक आयोगाची नियुक्ती केली आहे. या चौकशीचा अहवाल दोन महिन्यात सादर करायचा आहे. या अहवालातून हत्ये मागचं काय कारण समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच या प्रकरणात आता सुप्रीम कोर्टाचे वकील विशाल तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 2017 पासून झालेल्या  183 एन्काऊंटरचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT