सामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सी प्रवास महागणार
कोरोना विषाणूच्या वाढत्या केसेसमुळे लॉकडाउनचं संकट, त्यातच वाढती महागाई, पेट्रोलचे भाव अशा संकटात सापडलेल्या सामान्य लोकांवर आणखी एक संकट आलेलं आहे. आजपासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यामध्ये ३ ते ४ रुपयांची भाडेवाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र मोटार वाहन विभागाने नवीन दरपत्रक जाहीर केलं आहे. दीड किलोमीटरच्या अंतरासाठी याआधी ग्राहकांना १८ रुपये द्यावे लागायचे. नवीन दरपत्रकानुसार आता […]
ADVERTISEMENT
कोरोना विषाणूच्या वाढत्या केसेसमुळे लॉकडाउनचं संकट, त्यातच वाढती महागाई, पेट्रोलचे भाव अशा संकटात सापडलेल्या सामान्य लोकांवर आणखी एक संकट आलेलं आहे. आजपासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यामध्ये ३ ते ४ रुपयांची भाडेवाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र मोटार वाहन विभागाने नवीन दरपत्रक जाहीर केलं आहे.
ADVERTISEMENT
दीड किलोमीटरच्या अंतरासाठी याआधी ग्राहकांना १८ रुपये द्यावे लागायचे. नवीन दरपत्रकानुसार आता याच अंतरासाठी ग्राहकांना २१ रुपये मोजावे लागणार आहेत. याचसोबत रात्रीच्या प्रवासासाठी रिक्षाचं भाडं हे २३ रुपये होतं मात्र नवीन दरपत्रकानुसार हे भाडं आता २७ रुपये एवढं असणार आहे.
मुंबई, ठाणे आणि नजिकच्या भागात प्रवासासाठी टॅक्सी हा सर्वसामान्य मुंबईकरांसाठी हक्काचा पर्याय आहे. जुन्या दरपत्रकानुसार दीड किलोमीटरच्या अंतरासाठी ग्राहकांना २२ रुपये द्यावे लागायचे. आजपासून नवीन वेळापत्रकानुसार याच अंतरासाठी आता ग्राहकांना २५ रुपये द्यावे लागणार आहेत. याचसोबत टॅक्सीचं रात्रीचं भाडंही २८ रुपयांवरुन ३२ रुपयांवर करण्यात आलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून महागाईमुळे सामान्य जनतेचं कंबरडं मोडलं आहे. पेट्रोलच्या वाढत्या दरांमुळे दूध, फळं, भाजीपाला यांचे भावही गगनाला भिडले आहेत. अशातच रिक्षा-टॅक्सीच्या दरवाढीमुळे सामान्यांसमोर नवीन संकट निर्माण झालेलं आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT