Pathan : मॉलमध्ये बजरंग दलाचा राडा; रिलीज होण्यापूर्वीच वाद तापला!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Bajrang Dal workers protest against the promotion of Shah Rukh Khan’s movie ‘Pathaan: अहमदाबाद : पठाण चित्रपटाविरोधात वातावरण तापलं आहे. शाहरुख खानच्या या आगामी चित्रपटावर हिंदू आणि मुस्लिम समित्यांनी, संघटनांनी, गटांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. तसंच चित्रपट प्रदर्शित न करण्याचाही इशारा दिला आहे. अशातच गुरुवारी बजरंग दलाने चित्रपट प्रदर्शन होण्यापूर्वीच फक्त प्रमोशन सुरु असतानाच हिंसक निदर्शन केली. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

ADVERTISEMENT

अहमदाबादच्या आल्फावन मॉलमध्ये गुरुवारी रात्री बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहत चित्रपटाच्या प्रमोशनला आणि प्रदर्शनाला विरोध दर्शवला. तसंच चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी इशारा दिला. यावेळी पठाण चित्रपटाचे पोस्टर्स फाडण्यात आले. शिवाय तिथं असलेले कटआऊट्स देखील मोडण्यात आले. यावेळी एक कार्यकर्ता थेट गदाच घेऊन पोहचल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे.

हे वाचलं का?

या चित्रपटाच्या प्रदर्शनावर आक्षेप घेण्याचं मुख्य कारण म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोणने यात परिधान केलेली भगव्या रंगाची बिकिनी आहे. यावरून भारतात बरंच राजकारण झालं. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) या गाण्यावरूनही बराच गदारोळ झाला होता.

दरम्यान, सेंसर बोर्डाने या चित्रपटात भगवी बिकनी आणि गाण्यामध्ये काही बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सीबीएफसी एक्झॅमिनेशन कमिटी चित्रपटाच्या सर्टिफिकेशनसाठी गेली होती. त्यानंतर सीबीएफसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार चित्रपटाचे सर्व पैलू पाहिले गेले. यानंतर, निर्मात्यांना चित्रपटात काही बदल करण्याचा त्यांनी सल्ला दिला आहे.

ADVERTISEMENT

या वादावर सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी म्हणतात, “सेन्सॉर बोर्ड नेहमीच सर्जनशील अभिव्यक्ती आणि लोकांच्या संवेदनशीलतेमध्ये योग्य संतुलन राखते. आमचा विश्वास आहे की परस्पर संवादातून सर्व समस्यांवर तोडगा निघू शकतो. सुचवलेले बदल पूर्ण होईपर्यंत, मी सांगू इच्छितो की आपली संस्कृती आणि श्रद्धा वैभवशाली, जटिल आणि सूक्ष्म आहे. कोणत्याही कथेतून त्याची व्याख्या होऊ नये याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. निर्मात्यांनी या दिशेने काम केले पाहिजे.”

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT