गुणरत्न सदावर्तेंसमोरील अडचणी वाढल्या?; भाजप तालुकाध्यक्षांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

मुंबई तक

सिल्व्हर ओक बाहेरील हिंसक आंदोलनामुळे चर्चेत आलेले आणि सध्या सातारा पोलिसांच्या कोठडीत असलेले गुणरत्न सदावर्ते यांच्यासमोरील अडचणी वाढत आहेत. सदावर्ते यांच्याविरुद्ध बीडमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाबद्दल केलेल्या वक्तव्या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात नोंदवल्या गेलेल्या गुन्ह्यांची यादी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

सिल्व्हर ओक बाहेरील हिंसक आंदोलनामुळे चर्चेत आलेले आणि सध्या सातारा पोलिसांच्या कोठडीत असलेले गुणरत्न सदावर्ते यांच्यासमोरील अडचणी वाढत आहेत. सदावर्ते यांच्याविरुद्ध बीडमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाबद्दल केलेल्या वक्तव्या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात नोंदवल्या गेलेल्या गुन्ह्यांची यादी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानाबाहेर झालेल्या हिंसक आंदोलन प्रकरणामुळे अडचणीत असतानाच सदावर्तेंविरुद्ध सातारा, अकोल्या आणि आता बीडमध्येही गुन्हा दाखल झाला आहे.

भाजपचे बीड तालुकाध्यक्ष ॲड.स्वप्नील गलधर यांच्याकडून सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाविषयी तसेच मराठा समाज बांधवांच्या मोर्चाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणात बीडमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवला गेला आहे.

मुंबई पोलिसांच्या तावडीतून सुटलेले गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या कोठडीत

हे वाचलं का?

    follow whatsapp